ETV Bharat / state

व्यापाऱ्याचे अपहरण करून घातला दीड कोटींचा गंडा, तोतया आयकर अधिकाऱ्यांचा प्रताप - Fraud income tax officer

चिपळूण बाजारपेठेत (In the Chiplun market) तोतया आयकर अधिकारी (Fraud income tax officer) म्हणुन आलेल्या तीघांनी एका व्यापाराचे अपहरण (Merchant kidnapped) करुन तब्बल दीड कोटींचा गंडा घालला (robbed of Rs 1.5 crore) आहे. या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुण्यातून तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

The glory of bogus officer
तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप
author img

By

Published : Mar 8, 2022, 12:40 PM IST

Updated : Mar 8, 2022, 1:32 PM IST

चिपळूण: बाजारपेठेत एक कारागीर सोन्याचे दागिने बनवण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे. मूळचा पश्चिम बंगाल येथील असलेल्या या कारागिरांचे ओतारी गल्लीत छोटे दुकानही आहे. याठिकाणी रविवारी रात्री ८.३० वाजता तिघेजण तेथे आले व आम्ही आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी धाड टाकल्याचा बनाव केला. तसेच चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. सोबत दागिने व रक्कम ही घ्यावी लागेल असे बजावले. त्याप्रमाणे संबंधित कारागिर सोबत जाण्यास तयार झाला.

तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप

नंतर एका कार मधून त्यांनी त्याला मुंबईच्या दिशेने नेले. मात्र महामार्गावर माणगाव येथे सोडून ते तिघेजण मुंबईच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर काही वेळातच कारागिराने पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच त्यांचे वर्णनही सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित गाडीचा माग घेतला. त्यात ते पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार त्या तिघांना पुणे येथे ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.