रत्नागिरी - रेल्वे मार्गावर मध्यरात्रीपासून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. लूप लाईनच्या कामासाठी कोकण रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. निवसर ते आडवली दरम्यान हा आठ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला होता. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्या 2 ते 4 तास उशिराने धावत आहेत. मात्र, गैरसोय झाल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उशिर झालेल्या गाड्या -
- एलटीटी - करमाळी हाँलीडे स्पेशल 2 तास 11 मिनिटे उशीर
- रत्नागिरी - दादर पँसेंजर 2 तास उशीर
- सीएसटी - मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस, 2 तास 20 मिनिटे
- दादर - सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 1 तास 9 मिनिटे उशीर
- रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर 2 तास उशीर
- मडगाव - रत्नागिरी पॅसेंजर 4 तास उशीर
- एलटीटी - मडगाव डबलडेकर 1 तास उशीरा