ETV Bharat / state

मैथिलीचा मारेकरी तब्बल एका वर्षानंतर जेरबंद - मैथिली हत्या प्रकरण

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील मैथिली गवाणकर या युवतीच्या खुनातील संशयिताला तब्बल एक वर्षानंतर पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलं आहे.

Maithili's killer arrested after one year
मैथिलीचा मारेकरी तब्बल एका वर्षानंतर जेरबंद
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:38 PM IST

रत्नागिरी- तालुक्यातील खेडशी येथील मैथिली गवाणकर या युवतीच्या खुनातील संशयिताला तब्बल एक वर्षानंतर पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलं आहे. कोणताही भक्कम पुरावा नसताना देखील केवळ पोलिसांची तीक्ष्ण नजर, चतुराई आणि चौफेर तपासाच्या जोरावर रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे.

निलेश उर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (35,रा.भंडारवाडी खेडशी,रत्नागिरी) असे या संशयित आरोपीचं नाव आहे. 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळच्या सुमारास मैथिली प्रवीण गवाणकर (16,रा.चिंचवाडी खेडशी,रत्नागिरी ) ही बकऱ्या चारण्यासाठी खेडशी गावातील मोडा जंगलात गेली होती. तेव्हा अज्ञाताने तिच्या डोक्यात जड वस्तू मारून तिचा खून केला होता. त्यानंतर तब्बल एका वर्षानंतर या प्रकरणातील संशयिताला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.

मैथिली खेडशी येथील महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. 9 ऑगस्ट 2019 रोजी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर मैथिली 4 वाजेचाच्या सुमारास शेळ्या घेऊन चिंचवाडी सडा येथील जंगलात गेली होती. मात्र सायंकाळी 6 वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास शेळ्या घरी आल्या. मात्र मैथिली काही आली नव्हती. त्यामुळे तिच्या शोध घेण्यात आला. त्यानंतर रात्री सडा येथील जंगलात एका झाडाखाली मैथीलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.

याप्रकरणी ग्रामीण पोलीस तपास करत होते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास जानेवारी महिन्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला होता. हा तपास करताना खेडशी येथील स्थानिकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी निलेशला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला निलेश सुरुवातीपासूनच पोलिसांच्या संशयितांच्या यादीत नव्हता. परिचित म्हणून त्याचे म्हणणे पोलिसांनी खुनानंतर घेतले होते. त्याचे कॉल रेकॉर्डस् सुद्धा मैथिलीच्या मोबाईल मध्ये नव्हते. त्यात खुनानंतर हा संशयित मुंबईला निघून गेला होता. त्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर गावी आला होता. यावेळी निलेश एलसीबीच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. चौकशीतून त्याने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे तो अधिकच अडकत गेला आणि अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग , अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सपोफौ तानाजी मोरे, पांडुरंग गोरे, पोहेकॉ प्रशांत बोरकर, राजू भुजबळराव, भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, अपुर्वा बापट, चालक संजय जाधव, पोलीस नाईक अरुण चाळके, रमीज शेख, अमोल भोसले, बाळू पालकर, गुरु महाडीक, मिलींद कदम, रमीज शेख, गुरू महाडिक यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.