ETV Bharat / state

रत्नागिरीत आजपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊन - ratnagiri lockdown news

8 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे.

lockdown
रत्नागिरीत आजपासून पुढील 8 दिवस कडक लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 1, 2020, 4:24 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 600 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे.

आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

काय बंद / काय सुरू

अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने व आस्थापने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहणार. पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंध. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सीमा या कालावधीत बंद असतील, सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहील. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे व सामाजिक अंतर (6 फूट) ठेवणे बंधनकारक, दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना बंदी, मोठ्या प्रमाणात जमाव जमेल अशी कोणतीही कृती करता येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई, असे केल्यास कायदेशीर शिक्षा होणार.

सुरू काय राहणार

आपत्ती व्यवस्थापन आणि अत्यावश्यक सेवांच्या आस्थापना व कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह तर अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये 10 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा आणि स्वच्छता करणाऱ्या यंत्रणा तसेच बँका, टपाल, कुरियर, दूरध्वनी आणि इंटरनेट पुरवणाऱ्या आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, आय.टी. आस्थापना, ई-कॉमर्स जसे अॅमेझॉन यांच्या सेवा सुरू राहतील.

अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, दूधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू राहतील. मांस/मासे आणि अंडी यांची दुकाने बुधवार, शुक्रवार व रविवारी सुरू राहतील. रुग्णालये, वैद्यकीय आस्थापना, मेडिकल दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने व देखभाल केंद्र तसेच पाळीव प्राण्यांची पशुवैद्यक आस्थापना व दुकाने सुरू राहतील. सर्व प्रकारचे उद्योग व त्यासंबंधी असणाऱ्या व्यवसायाच्या आस्थापना ऑईल, गॅस व ऊर्जा संसाधनांच्या आस्थापना व गोदामे सुरू राहतील.

प्रसारमाध्यमे व इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू राहील. शासकीय कामे, शेती कामे, कृषीमाल प्रक्रिया व साठवणूक सर्व बंदरे व त्याच्याशी निगडीत बाबी सुरू राहतील. अंत्यविधीसाठी कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत 20 जणांसाठी परवानगी असेल. मद्यविक्री ऑनलाईन मागणी स्वीकारुन घरपोच सेवा सुरु ठेवता येईल. निसर्ग चक्रीवादळाच्या पुर्नबांधणी, पंचनामे व मदत वाटप याच्या आस्थापना सुरू असतील .ज्या घटकांना सुरु ठेवण्याची मुभा आहे त्यांनी अत्यावश्यक बाबीसाठी ओळखपत्र व वाहनावर स्वयंघोषित फलक लावून प्रवास वा वाहतूक करता येईल. अत्यावश्यक सेवा व त्यांच्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरू असतील. सायंकाळी 5 ते सकाळी 9 या कालावधीत केवळ वैद्यकीय तपासणीखेरीज घराबाहेर पडता येणार नाही. याखेरीज कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.