ETV Bharat / state

कोरोना : रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये १५ जुलैपर्यंत वाढ - मिशन ब्रेक द चेन रत्नागिरी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा कालावधी आता येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वी लागू असलेले निर्बंधच 15 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी येत्या १५ जुलैपर्यंत वाढला

author img

By

Published : Jul 8, 2020, 8:54 PM IST

रत्नागिरी : गेले काही दिवस जिल्ह्यात सातत्याने 2 आकडी संख्येनेच रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी 'मिशन ब्रेक द चेन' या नावाने गेल्या १ जुलैपासून आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. आज त्याची मुदत संपल्याने पुढे काय होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. ती आता संपली आहे. हा लॉकडाऊनचा कालावधी आता येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वी लागू असलेले निर्बंधच 15 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 800 च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात आणखी 25 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 806 वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीदेखील चांगली असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.