ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस, 24 तासांत 7 तालुक्यात अतिवृष्टी - रत्नागिरी अतिवृष्टी

गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. 24 तासात 9 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज (बुधुवार) सकाळपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस झालेला आहे.

last 24 hours Heavy rain in Ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस
author img

By

Published : Aug 5, 2020, 3:03 PM IST

Updated : Aug 5, 2020, 5:03 PM IST

रत्नागिरी - गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. 24 तासात 9 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज (बुधुवार) सकाळपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस झालेला आहे. सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 87.68 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 3394.9 मिलीमीटर आहे. आजपर्यंत 1603.36 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस आत्तापर्यंत पडला आहे.

24 तासात सरासरी 87.68 मिमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 87.68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, मंडणगडमध्ये 92.30 मिमी, दापोली 45.00 मिमी, खेड 54.80 मिमी, गुहागर 94.70 मिमी, चिपळूण 96.40 मिमी, संगमेश्वर 132.70 मिमी, रत्नागिरी 112.50 मिमी, राजापूर 82.90 मिमी, लांजा 77.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस, 24 तासांत 7 तालुक्यात अतिवृष्टी
आजपर्यंत सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यातदरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात 1 जूनपासून सर्वा‍धिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात नोंदवला गेला आहे. रत्नागिरी तालुक्यात 2063.13 मिमी पाऊस नोंदवला गेला. तर सर्वात कमी 1101.17 मिमी पाऊस मंडणगड तालुक्यात नोंदवला गेला आहे.तालुकानिहाय आजवरचा पाऊस मंडणगड 1101.17 मिमी, दापोली 1225.41, खेड 1308.18, गुहागर 1824.75, चिपळूण 1453.51, संगमेश्वर 1949.82, रत्नागिरी 2063.13, लांजा 1714.72 आणि राजापूर 1789.58 मिमी.

Last Updated : Aug 5, 2020, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.