रत्नागिरी - तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोकणातही कधी नव्हे तो पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मात्र हाच वाढलेला पारा आंबा खवय्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे आंबा झाडावर लवकर तयार होऊ लागला आहे. आंबा लवकर पिकल्याने सध्या स्थानिक बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत. आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
यामुळे हंगामाच्या सुरुवातीला दीड ते अडीच हजार रुपये डझन असा असणारा आंबा आता मात्र १५० रुपये ते ४०० रुपये असा मिळू लागला आहे. यामुळे आंबे खरेदीसाठी स्थानिक बाजारात गर्दी दिसून येत आहे. तापमान वाढल्याने सर्वच जण सध्या गर्मीने हैराण आहेत. पण याच तापमान वाढीचा परिणाम फळांच्या राजावर दिसू लागला आहे. यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोकणात सुद्धा तापमान वाढत आहे. कोकणात दुपारनंतर तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशाच्या मध्ये राहातो. तापमान वाढल्याचा परिणाम हापूस आंब्यावर दिसू लागला आहे. तापमान वाढले तर आंबा लवकर पिकतो. सध्या कोकणात वाढलेल्या तापमानामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. परिणामी आंब्याची आवक वाढली आणि मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आंबा बाजारात येवू लागला आहे. यामुळे आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पाहूया रत्नागिरी बाजारातील आंब्याची स्थिती काय आहे.
वाढत्या उष्णतेचा आंब्यावर परिणाम
हजारो डझन पिकलेला आंबा स्थानिक बाजारात
कच्च्या आंब्यापेक्षा पिकल्या आंब्याची आवक वाढली
१५० ते ४०० रुपये डझन आंब्याची विक्री
रत्नागिरीतल्या ग्रामिण भागातून पिकलेला आंबा बाजारात
सुरूवातीला दिड ते तीन हजार रूपये डझन होता आंबा
स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होऊ लागला आहे. पर्यायाने हापूसचा दर खाली येऊ लागला आहे. सुरवातीच्या तुलनेत आता आंब्याचे दर बरेच खाली आले आहेत. १५० ते ४५० रुपये डझनपर्यंत दर गडगडले आहेत.
दर गडगडल्याने सध्या हापूसच्या पिकलेल्या आंब्याची चव चाखणाऱ्या खवय्यांची बाजारात आंबा खरेदीसाठी झुंबड उडालेली पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आंबा परवडत असल्याने कोकणात आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदीसाठी बाजारात आलेले पहायला मिळत आहेत. यामुळे कुणी दहा डझन तर कुणी पाच अशा प्रकारे आंबे खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोकणातल्या बाजारात सकाळ पासूनच कोकणात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची, सर्वसामान्यांचीही आंबे खरेदीसाठी गर्दी झाली.
एकीकडे वाढलेल्या तापमानाने उकाड्याने सर्वसमान्य होरपळतोय. मात्र, फळांचा राजा आज वाढलेल्या तापमानामुळे सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झाला असलात तरी आंबे खाण्यासाठी कोकणातच या. तर मग कोकणाकडे येवा... आंबे यथेच्छ खाण्याची मज्जा फक्त आणि फक्त कोकणातच येवू शकते.