रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर, काही तालुक्यांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रभाव चढाच आहे. लांजा तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लांजा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आज बाजारपेठ बंदचा तिसरा दिवस आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी उपाय म्हणून सर्व व्यापारी संघटना कमिटी, सल्लागार, सदस्य या सर्वांच्या संमतीने लांजा बाजारपेठेतील सर्व सेवा रविवार, ६ सप्टेंबर ते शुक्रवार ११ सप्टेंबर या कालावधीपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्णतः बंद आहे.
आज बंदचा तिसरा दिवस आहे. या दरम्यान शासकीय दूध वितरण सेवा, खामकर दूध डेअरी, वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा नियोजन केलेल्या ठराविक वेळेत सुरू आहेत.
हेही वाचा- दापोलीच्या हर्णे बंदराला वादळाचा फटका; नौकेला जलसमाधी