ETV Bharat / state

Kunbi Jodo Abhiyan : कुणबी समाज येथील विविध राजकीय पक्षांनी चोरला - अशोक वालम - Kunbi Samaj was Stolen By Various Political

कुणबी समाज ( Kunbi community ) येथील विविध राजकीय पक्षांनी चोरला आहे, म्हणून या समाजाला शोधणार आणि समाजाच्या प्रश्नांसाठी एका झेंड्याखाली आणणार असे अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ( Kunbi Samaj was Stolen By Various Political Parties )

Kunbi Jodo Abhiyan
अशोक वालम
author img

By

Published : Dec 3, 2022, 9:48 AM IST

रत्नागिरी : कुणबी समाज ( Kunbi community ) येथील विविध राजकीय पक्षांनी चोरला आहे, म्हणून या समाजाला शोधणार आणि समाजाच्या प्रश्नांसाठी एका झेंड्याखाली आणणार असल्याचे ‘कुणबी जोडो अभियान' ( Kunbi Jodo Abhiyan )राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम ( Ashok Valam ) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला अशोक वालम यांच्यासह कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे, रत्नागिरीचे नंदकुमार मोहिते, ऍड, सुजित झिमण, सरचिटणीस अरविंद डाफळे, तसेच शांताराम मालप आदी पदाधिकाऱयांची उपस्थिती होती. ( Kunbi Samaj was Stolen By Various Political Parties )

कुणबी समाज येथील विविध राजकीय पक्षांनी चोरला - अशोक वालम

समाजाला एकत्र आणण्यासाठी अभियान : या अभियान रॅलीचे राजकीय समिती अध्यक्ष अशोक वालम यांनी सडेतोड विधान करून राजकीय पक्षांवर बोट रोखले आहे. जिल्ह्यात 65 टक्के कुणबी समाज आहे. सर्वात मोठ्या संख्येने असलेला हा समाज आज आहे कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा समाज सर्व राजकीय पक्षांनी चोरलाय असे वालम यांनी सांगितले. त्यामुळे या समाजाला एकत्र आणण्यासाठी हे अभियान आहे. समाज एकत्र आला तरच प्रलंबित पश्नांची व कुणबी समाजाची दखल घेतली जाईल. त्यासाठी कुणबी समाजाची एकत्र मोट बांधणार असल्याचं वालम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरात काढण्यात आली रॅली : या पत्रकार परिषदेपूर्वी कुणबी समाज बांधवांनी रत्नागिरी शहरात मोठी दुचाकी रॅली काढली. मारूतीमंदिर येथील छ.शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली पुढे तालुक्यात मार्गस्थ झाली. मोठया संख्येने समाजबांधव, युवक वर्गही उपस्थित होते.कुणबी समाज येथील विविध राजकीय पक्षांनी चोरला आहे, म्हणून या समाजाला शोधणार आणि समाजाच्या प्रश्नांसाठी एका झेंड्याखाली आणणार असे अशोक वालम म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.