ETV Bharat / state

कोकणची पोरं हुशार..! विभाग पुन्हा एकदा राज्यात अव्वल - कोकण विभाग निकाल

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून बारावीसाठी 30 हजार 143 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 28 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण 95.89 टक्के एवढे आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 19 हजार 607 विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 728 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 95.52 टक्के निकाला लागला.

konkan-board-first-in-hsc-results-2020
विभाग पुन्हा एकदा राज्यात अव्वल
author img

By

Published : Jul 16, 2020, 7:51 PM IST

रत्नागिरी - बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभाग सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिले आहे. कोकण विभागाचा यावर्षीचा निकाल 95.89 टक्के लागला आहे.

विभाग पुन्हा एकदा राज्यात अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (ता. 16) दुपारी एक वाजता जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के एवढा निकाल लागला आहे. कोकण विभागाने संपूर्ण राज्यात अव्वल येण्याचा मान सलग आठव्या वर्षी मिळवला आहे. त्यामुळे कोकणची पोरं हुशार, हे पुन्हा एकदा निकालावरुन सिद्ध झाले आहे. याखेरीज कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 96.57 टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.52 टक्के एवढा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. निकालानुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून बारावीसाठी 30 हजार 143 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 28 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे एकूण प्रमाण 95.89 टक्के एवढे आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 19 हजार 607 विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 728 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 95.52 टक्के निकाला लागला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 536 विद्यार्थ्यांपैकी 10 हजार 175 म्हणजेच 96.57 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची बाजी...रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.70 टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 97.04 टक्के आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.71 टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 97.69 टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण विभागात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 97.20 टक्के, तर मुलांची 92.40 टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 4.8 टक्के अधिक असल्याचे स्पष्ट होते.

60 परीक्षा केंद्रांवर झाली परीक्षा...
कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 244 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 60 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 153 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 37 परीक्षा केंद्र होती, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 91 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 23 परीक्षा केंद्रांचा समावेश होता.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक...
यावर्षी कोकण विभागाच्या निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून, विज्ञान शाखेचा 98.57 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल 97.89 टक्के निकाल लागला आहे, तर व्यावसायिक विषय शाखेचा निकाल 95.29 टक्के, तर कला शाखेचा 90.26 टक्के लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.