रत्नागिरी - राज्यातील ठाकरे सरकार हे गुंडाचे सरकार आहे, असा हल्लाबोल भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा देखील त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.
राज्यात गुंडांचे सरकार - किरीट सोमैया
यावेळी बोलताना सोमैया म्हणाले की, राम मंदिराच्या मुद्यावरून आंदोलन करण्याचा अधिकार हा मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना जसा आहे, त्याच पद्धतीनं राम मंदिराच्या मुद्यावरून आंदोलन करण्याचा अधिकार भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांना देखील आहे. शिवसेना भवनासमोर भाजपाच्या युवा कार्यकत्यांवर झालेला हल्ला स्पष्ट करतो की, राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हे गुंडांचे सरकार आहे.
हेही वाचा -भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी