रत्नागिरी - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे, जर मी गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन, असे सोमैया ( Kirit Somaiya comment on Sanjay Raut press conference ) यांनी म्हटले. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - Khed Bell Agitation : ...अन्यथा खेड शहर भकास होईल, कौस्तुभ बुटाला यांचा आरोप
सोमैया म्हणाले की, विषय डायव्हर्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जात आहे. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून साडेतीन लोकांची नाटके. साडेतीन लोकांना अटक करण्याचे उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का? असा सवाल किरीट सोमैया यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरेंनी नाटके बंद करावीत, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना नेते संजय राऊत चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यासंदर्भात बोलताना राऊत यांनी 'आता खूप झाल. आता डोक्यावरून पाणी जातय. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उत्तर देणार. ( Sanjay Raut criticizes BJP ) आता भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील.' अशी सडेतोड प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
'उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असेलच पण सोबतच पक्षाचे इतर पदाधिकारी सर्व आमदार, खासदार देखील असतील. आम्ही सर्व एकत्र ही पत्रकार परिषद घेणार आहोत. ( Press conference at Shiv Sena Bhavan ) आमच्या पक्षावर मुख्यमंत्र्यांवर आणि संपूर्ण ठाकरे परिवारावर चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उद्या सडेतोड उत्तर देऊ.'
आता खूप झाल
'यांचं आता खूप झाल. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल अनिल देशमुखांच्या बाजूच्या तुरुंगात हा मंत्री जाईल तो मंत्री जाईल. आता डोक्यावरुन मोठ पाणी गेल. आम्ही खूप सहन केल आता बघाच काय होईल.
भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात
'आम्ही यांच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्हाला सांगतो आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री नाही तर भाजपच्या नेत्यांपैकी साडेतीन लोक देशमुखांच्या तुरुंगात असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. आय रिपीट बस झाल आता राजकीय मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे. आता तुम्हाला कळेल आम्ही काय करू ते असा दमही त्यांनी दिला आहे. राऊत यांच्या या विधानामुळे आता भाजपचे कोण साडेतीन लोक तुरुंगात जाणार त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
भाजपाकडून येणाऱ्या आरोपांना उत्तर देणार
भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यावर भाजपाकडून येणाऱ्या आरोपांना आपण मंगळवारी ( 15 फेब्रुवारी ) दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत कागदपत्राच्या पुराव्या सहीत उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Press Conference Shivsena Bhavan ) दिला. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवावे, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला ( Sanjay Raut On Ed Cbi ) लगावला होता.