ETV Bharat / state

कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, धरणातील गाळ काढण्याची मागणी - water

कळझोंडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. धरणात १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या जयगड पंचक्रोशीवासीयांवर भविष्यात भीषण पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.

कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
author img

By

Published : May 10, 2019, 12:21 PM IST

रत्नागिरी - कळझोंडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. धरणात १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या जयगड पंचक्रोशीवासीयांवर भविष्यात भीषण पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्यावर मात करण्यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. धरणातील गाळ काढण्यासह अन्य कामे हाती घ्यावीत, त्यासाठी वाटद खंडाळा येथील ग्रामस्थ सुनिल जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील वाटद, आगरनारळ, कोळीसरे, रिळ, उंडी यासह इतर सर्व गावांना जयगड नळपाणी योजनेच्या कळझोंडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. कळझोंडी धरण हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. त्यावर काम करणारे कर्मचारी नियमित कामगार आहेत. कळझोंडी धरणाची मुख्य भिंत १६५ मिटर लांबीची आणि १० मीटर उंचीची आहे. धरणात मुख्य भिंतीपासून पाठीमागे २०० मीटर रुंदी तर ९५० मीटर लांबी, असे पाणीसाठा क्षेत्र आहे. १ मे रोजी धरणावरील कर्मचारी मिळालेल्या माहितीनुसार धरण भिंत ते पाठीमागील ३०० ते ४०० मिटर क्षेत्रापर्यंत १० फुट उंचीचा पाणीसाठा उपलब्ध आहे.

कळझोंडी धरण हे फार जुने आहे. धरण भिंत आणि त्याखालील बांधण्यात आलेले छोटे-छोटे बंधारे वाहत आहेत. पुढील १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात आहे. धरणसाठा वाढवण्यासाठी बंधाऱ्यावर माती टाकून उंची वाढवली जाते. त्यामुळे १ ते २ मिटर धरणाची उंची वाढते आणि पाणीसाठा होतो. सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुढील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना जयगड परिसरातील लोकांना करावा लागणार असल्याचे जाधव यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.

सैतवडे, गुंबद, जांभारी, जयगड, नांदिवडे, साखरमोहल्ला या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नांदिवडेतील विहिरिचे पाणीही दुषीत झाले आहे. तत्कालीन जि. प. सदस्य प्रसाद पाटील आणि माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांच्या प्रयत्नाने जयगड नळ पाणी प्रादेशिक योजनेच्या कळझोंडी धरणासाठी आघाडी सरकारच्या काळात जयगडकडे जाणारी मुख्य जलवाहीनी पुर्णत: नवीन टाकण्यात आली. त्याचा दुसरा टप्पा म्हणून धरणाची उंची वाढवणे, धरणातील गाळ काढणे, धरण क्षेत्र बंदिस्त करणे, नवीन जलविद्युत पंप सेट खरेदी करणे, विद्युत जनित्र नवीन बसवणे, पंप हाऊस दुरुस्त करणे इत्यादीसाठी विद्यमान आमदार उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करुन दिला. परंतू, लोकसभा निवडणुकीच्या आचार संहीतेमुळे एकही काम अद्याप सुरु झालेले नाही.

पुढील वर्षी पाणी टंचाई भासू नये म्हणून पात्रातला गाळ काढणे आवश्यक आहे. हे काम युध्द पातळीवर होणे जरुरीचे आहे. जेसीबी मशीनने खोदाई केल्यास पावसाळ्यापर्यंत धरणाचा पाणीसाठा वाढेल. त्यासाठी जिंदाल कंपनी व्यवस्थापनाची मदत घेणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. येथील गाळ जवळच्या बागायतदारांना किंवा निवळी जयगड रस्त्याच्या दुतर्फा टाकुन ठेवल्यास रस्ता रंदिकरणास उपयोगी पडेल. नांदिवडे गावचे पाणी दुषीत झाल्यामुळे जिंदाल कंपनी स्वत: छोट्या मोठ्या टाक्यांनी पाणी पुरवत आहे. तसेच त्यांनी बावनदीवरून आणलेले पाणी वेळ प्रसंगी जयगड, साखर मोहल्ला या गावांना पुरवण्यात येत आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी कळझोंडी धरणातील गाळ काढावा अशी मागणी जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Intro:कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा,

धरणातील गाळ काढण्याची मागणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. जास्तीत जास्त पंधरा दिवसच पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या जयगड पंचक्रोशीवासीयांवर भविष्यात भीषण पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्यावर मात करण्यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. कळझोंडी धरणातील गाळ काढण्यासह अन्य कामे हाती घ्यावीत त्यासाठी वाटद खंडाळा येथील ग्रामस्थ सुनिल ऊर्फ भाई जाधव यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिलं आहे.
तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील वाटद, आगरनारळ, कोळीसरे, रिळ, उंडी यासह इतर सर्व गावांना जयगड नळपाणी योजनेच्या कळझोंडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. कळझोंडी धरण हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. त्यावर काम करणारे कर्मचारी नियमित कामगार आहेत. कळझोंडी धरणाची मुख्य भिंत १६५ मिटर लांबीची आणि १० मीटर उंचीची आहे. धरणात मुख्य भिंतीपासून पाठीमागे दोनशे मिटर रुंदी तर ९५० मिटर लांबी असे पाणी साठा क्षेत्र आहे. १ मे रोजी धरणावरील कर्मचारी मिळालेल्या माहितीनुसार धरण भिंत ते पाठीमागील ३०० ते ४०० मिटर क्षेत्रापर्यंत १० फुट उंचीचा पाणीसाठा उपलब्ध आहे.
कळझोंडी धरण हे फार जुन आहे. धरण भिंत आणि त्याखालील बांधण्यात आलेले छोटे-छोटे बंधारे वाहत आहेत. पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच साठा धरणात आहे. धरणसाठा सावढविण्यासाठी बंधा-यावर माती टाकून उंची वाढवली जाते. त्यामुळे १ ते २ मिटर धरणाची उंची वाढते आणि पाणीसाठा होतो. सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुढील वर्षी भिषण पाणीटंचाईचा सामना जयगड परिसरातील लोकांना करावा लागणार असल्याचे जाधव यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.
सैतवडे, गुंबद, जांभारी, जयगड, नांदिवडे, साखरमोहल्ला या गावांमध्ये पाण्याचे उद्भव नाहीत. नांदिवडेतील विहिरिचे पाणीही दुषीत झालेले आहे. तत्कालीन जि. प. सदस्य प्रसाद उर्फ बाऊ पाटील आणि माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे यांच्या प्रयत्नाने जयगड नळ पाणी प्रादेशिक योजनेच्या कळझोंडी धरणासाठी आघाडी सरकारच्या काळात जयगडकडे जाणारी मुख्य जलवाहीनी पुर्णत: नविन टाकण्यात आली. त्याचा दुसरा टप्पा म्हणून धरणाची उंची वाढविणे, धरणातील गाळ काढणे, धरण क्षेत्र बंदिस्त करणे, नविन जल विद्युत पंप सेट खरेदी करणे, विद्युत जनित्र नविन बसविणे, पंप हाऊस दुरुस्त करणे इत्यादीसाठी विद्यमान आमदार उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करुन दिला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचार संहीतेमुळे एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. मंजुर करण्यात आलेल्या निधीतून यावर्षीच्या पावसाळ्यापुर्वी कोणतेही काम सुरु होण्याची लक्षणे नाहीत. पुढील वर्षी पाणी टंचाई भासू नये म्हणून पात्रातला गाळ काढणे आवश्यक आहे. हे काम युध्द पातळीवर होणे जरुरीचे आहे. जेसीबी मशीनने खोदाई केल्यास पावसाळ्यापर्यंत धरणाचा पाणीसाठा वाढेल. त्यासाठी जिंदाल कंपनी व्यवस्थापनाची मदत घेणे आवश्यक असल्याचे श्री. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. येथील गाळ जवळच्या बागायतदारांना किंवा निवळी जयगड रस्त्याच्या दुतर्फा टाकुन ठेवल्यास रस्ता रंदिकरणास उपयोगी पडेल. नांदिवडे गावचे पाणी दुषीत झाल्यामुळे जिंदाल कंपनी स्वत: छोट्या मोठ्या टाक्यांनी पाणी पुरवत आहे. तसेच त्यांनी बावनदीवरून आणलेले पाणी वेळ प्रसंगी जयगड, साखर मोहल्ला या गावांना पुरवण्यात येत आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी कळझोंडी धरणातील गाळ काढावा अशी मागणी जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. Body:कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा,

धरणातील गाळ काढण्याची मागणी
Conclusion:कळझोंडी धरणात पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा,

धरणातील गाळ काढण्याची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.