ETV Bharat / state

जगबुडी, नारंगी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी - नारंगी नदीला पूर

सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पूरस्थिती
पूरस्थिती
author img

By

Published : Aug 4, 2020, 7:12 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड तालुक्यातही सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

या दोन्ही नद्यांच्या धोक्याची पातळी ही ७ मीटर इतकी आहे. आज सकाळी साडे आठ वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५० मीटर एवढी झाली होती तर सकाळी दहा वाजता ७.७५ मीटरपर्यंत पोहचली होती.त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

खेड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात ९८.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या नद्यांची पाणीपातळी सकाळी दहा वाजता ७.७५ मीटरपर्यंत पोहचली होती. जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्यामुळे खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग नजीक पहाटे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. दापोली व मंडणगड येथील वाहतूक शिवतरमार्गे क्षेत्रपालनगर-कुंभारवाडा मार्गे वळविण्यात आली आहे.

रात्रभर सुरू असलेल्या पावसाने बाजारपेठेतील वर्दळीवर परिणाम झालेला दिसून आला. नारंगी नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. त्यामुळे नदीलगतच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. खेड-बहिरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे खाडीपट्टयाकडे जाणारा मार्ग काहीकाळ बंद होता. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.