ETV Bharat / state

आमदार संजय कदम आणि सूर्यकांत दळवींना जनताच उत्तर देईल- योगेश कदम - दापोली विधानसभा मतदारसंघ

या निवडणुकीत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवी योगेश कदम यांच्याविरोधात काम करणार एवढे नक्की आहे. दळवी यांनी कितीही विरोध केला तरी इथला शिवसैनिक त्यांचे ऐकणार नाही. जनताच या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.

आमदार संजय कदम आणि सुर्यकांत दळवींना जनताच उत्तर देईल- योगेश कदम
author img

By

Published : Oct 8, 2019, 6:56 PM IST

Updated : Oct 8, 2019, 7:14 PM IST

रत्नागिरी- दापोली विधानसभा मतदारसंघ हा नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सूर्यकांत दळवी यांचा त्यांनी पराभव केला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचं दळवी नेहमी सांगतात. त्यानंतर दळवी आणि रामदास कदम यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.

ईटीव्ही भारतची योगेश कदम यांच्याशी विशेष बातचीत.

या निवडणुकीत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवी योगेश कदम यांच्याविरोधात काम करणार एवढे नक्की आहे. दळवी यांनी कितीही विरोध केला तरी इथला शिवसैनिक त्यांचे ऐकणार नाही. जनताच या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे. आमदार संजय कदम हे चुकून निवडून आलेले आहेत. दळवींवर नाराजी होती त्यामुळे लोकांना बदल हवा होता, त्यांनी तो बदल करून पाहिला. पण जनतेचा त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. जनतेला विकास हवा आहे, त्यामुळे जनताच या निवडणुकीत कदम यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे.

योगेश कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

Intro:आमदार संजय कदम आणि सुर्यकांत दळवी यांना जनताच या निवडणुकीत उत्तर देईल - योगेश कदम

संजय कदम हे चुकून आमदार झाले - योगेश कदम

रत्नागिरी, प्रतिनिधी

दापोली विधानसभा मतदारसंघ हा नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असणारा मतदारसंघ. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.. मात्र 2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सुर्यकांत दळवी यांचा त्यांनी पराभव केला. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचं दळवी नेहमी सांगतात. त्यानंतर दळवी आणि रामदास कदम यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.. दरम्यान या निवडणुकीत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.. त्यामुळे सुर्यकांत दळवी योगेश कदम यांच्याविरोधात काम करणार एवढं नक्की.. मात्र दळवी यांनी कितीही विरोध केला तरी इथला शिवसैनिक त्यांचं ऐकणार नाही. जनताच या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमदार संजय कदम हे चुकून निवडून आलेले आहेत. दळवींवर नाराजी होती त्यामुळे लोकांना बदल हवा होता, त्यांनी तो बदल करून पाहिला. पण जनतेचा त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. जनतेला विकास हवा आहे, त्यामुळे जनताच या निवडणुकीत कदम यांना उत्तर देईल असं सांगत योगेश कदम यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले. दरम्यान बेरोजगारीबाबत योगेश कदम यांना विचारलं असता इथला तरुण रोजगारासाठी इथेच कसा थांबेल यासाठी आपल्या काही योजना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.. दरम्यान रामदास कदम -सुर्यकांत दळवी वादाबाबत योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, विद्यमान आमदार संजय कदम यांच्याबाबत योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलं आहे. तसेच बेरोजगारीबाबत योगेश कदम यांचं काय म्हणणं आहे, या सर्व प्रश्नांबाबत योगेश कदम यांच्याशी बातचीत केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:आमदार संजय कदम आणि सुर्यकांत दळवी यांना जनताच या निवडणुकीत उत्तर देईल - योगेश कदम

संजय कदम हे चुकून आमदार झाले - योगेश कदमConclusion:आमदार संजय कदम आणि सुर्यकांत दळवी यांना जनताच या निवडणुकीत उत्तर देईल - योगेश कदम

संजय कदम हे चुकून आमदार झाले - योगेश कदम
Last Updated : Oct 8, 2019, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.