रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी आणखी 13 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 2 रुग्ण चिपळूण तालुक्यातील कामथे येथील उपकेंद्रात, 5 जण जिल्हा कोव्हीड रुग्णालयात, दापोली येथे 1 तर कळबणी रुग्णालयात 5 जणांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 एवढी झाली आहे.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
दरम्यान दररोज वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. कन्टेंनमेन्ट झोन जिल्ह्यात सध्या 49 कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यातील 19 गावांमध्ये, दापोलीतील 6 गावांमध्ये, खेडमधील 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात5 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यातील 12 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यातील 1 आणि राजापूर तालुक्यातील 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.