ETV Bharat / state

कोरोनामुळे कोलमडले सर्वसामान्यांचे बजेट; प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे खर्च वाढला - ratnagiri latest news

कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीक झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी होणारा खर्च वाढला आहे. त्याची वेगळीच तरतूद करावी लागत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

कोरोनामुळे कोलमडले सर्वसामान्यांचे बजेट
कोरोनामुळे कोलमडले सर्वसामान्यांचे बजेट
author img

By

Published : Dec 10, 2020, 8:09 AM IST

Updated : Dec 10, 2020, 10:02 AM IST

रत्नागिरी - जवळपास वर्षभरापासून कोरोना या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. आरोग्यास हाणीकारक असलेल्या कोरोना विषाणूने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडेही मोडले आहे. या महामारीच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात त्याचा उद्योग नोकरी व्यावसायावर परिणाम होऊन सर्वसामान्य माणूस पुरता कोलमडून पडला. सर्वसामान्यांचे बजेट पुरते बिघडले आहे. अनेकांना रोजगार गमवावे लागले, तर सर्वसामान्य जनतेला आर्थिक चणचणीत महागाईच्या भडक्याचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे जनतेचे बजेट कशा प्रकारे कोलमडले आहे, याबाबतचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

कोरोनामुळे कोलमडले सर्वसामान्यांचे बजेट
सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं-

कोरोना महामारीमुळे राज्यासह देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसाय बंद करावे, परिणामी अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. तर लॉकडाऊनमुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांंनाही दुकाने बंद करावी लागली. यासर्वाचा परिणाम सामान्य जनतेच्या आर्थिक नियोजनावर झाला. त्यातच महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. याला कोरोनाची पार्श्वभूमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने खबरदारी घेताना दिसत आहे. मात्र खबरदारीत सर्वसामान्यांचे महिन्याचं बजेट मात्र वाढले आहे. कारण घराबाहेर पडताना मास्क अनिवार्य आहे. त्यामुळे घरातील जर 5 जणांचं कुटुंब असेल तरी अगदी 200 रुपयांपासून ते अगदी 500 रुपयेपर्यंत मास्कचा खर्च महिन्याकाठी वाढला. तसेच सॅनिटाईझर, हँडवॉशचा खर्च वाढला. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात बदल करावे लागले. तो खर्चही वाढला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जवळपास दिड ते दोन हजार रुपयांच्या वाढीव खर्चाचा फटका बसला आहे.

छोट्या व्यवसायिकांचाही खर्च वाढला

कोरोनाचा फटका छोट्या व्यवसायिकांनाही बसला असून त्यांचा खर्चही वाढला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानात सॅनिटाईझर अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे किराणा मालाचे दुकानदार असतील किंवा भाजी व्यवासायिक किंवा अन्य दुकानदार असतील त्यांचा महिन्याला जवळपास एक ते दीड हजार रुपयांचा नुसता सॅनिटाईझरचा खर्च वाढला आहे.

याबाबत बोलताना भाजी व्यवसायिक अनंत शिंदे म्हणाले की, कोरोनामुळे गाडी व्यवसाय ठप्प झाले त्यामुळे भाजी व्यवसाय सुरू केला, मात्र इथेही अतिरिक्त खर्च वाढला.. सॅनिटाईझरचा खर्च वाढला. त्यात घरी देखील मास्क, ड्रायफ्रूट, फळं याचाही खर्चही वाढला, त्यामुळे महिन्याला दीड ते अडीच हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढल्याचं शिंदे यांनी सांगितले. एकूणच कोरोनामुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडल्याचं दिसून येत आहे..

धोका टळलेला नाही-

कोरोना विषाणूने गेल्या नऊ महिन्यांपासून देशात हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येने जगात दुसरे स्थान गाठले. त्यानंतर सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सध्या भारतात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी ही पहिल्या पेक्षा कमी आहे. मात्र, असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार स्तरावर योग्य त्या मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या जातात. मात्र, या

Last Updated : Dec 10, 2020, 10:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.