ETV Bharat / state

जुन्या गोष्टी मलाही माहिती आहेत, त्या टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार - नारायण राणे - नारायण राणे रत्नागिरी पत्रकार परिषद

माझा घसा ठीक झाल्यानंतर मी बोलायला सुरूवात करेन. रमेश भुवड हत्या प्रकरणासारखी प्रकरणं आम्हालाही माहिती आहेत. या सर्व गोष्टी टप्प्या टप्प्याने काढणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिली.

narayan rane latest news
narayan rane latest news
author img

By

Published : Aug 27, 2021, 7:04 PM IST

Updated : Aug 28, 2021, 8:12 AM IST

रत्नागिरी - आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरूवात केली. दरम्यान, त्यांनी आज रत्नागिरीतील भाजपा कार्यालयता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. माझा घसा ठीक झाल्यानंतर मी बोलायला सुरूवात करेन. रमेश भुवड हत्या प्रकरणासारखी प्रकरणं आम्हालाही माहिती आहेत. या सर्व गोष्टी टप्प्या टप्प्याने काढणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया

शिवसेनेने माझ्या वाट्याला जावू नये -

नारायण राणे यांनी त्यांना झालेल्या अटकेवरही प्रतिक्रिया दिली. 'केंद्रीय मंत्र्याला अटक करून राज्य सरकारने काय पराक्रम केला. दरोडेखोरांना अटक करावी, तशी मला अटक केली. त्यामुळे सरकारने दादागिरी करून माझ्या वाट्याला जाऊ नये, अशा सुचक इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. तसेच घरात बसून आम्हाला कारभार करायचा नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. गेल्या दोन दिवसात काय प्रकार झाला, तुम्ही पाहत आहे. सहा सात-तास लोकं रस्त्यावरती थांबली, हे यांच्या नशिबात नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवरती पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मी बोललो. दोन-अडीचशे पोलीस फौज घेऊन केंद्रीय मंत्र्याला अटक केली. काय पराक्रम केला. महाराष्ट्राची जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये लोक मरण पावत असतील तर, यांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - OBC आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Aug 28, 2021, 8:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.