रत्नागिरी - वादळी वाऱ्यामुळे कोकणच्या किनारपट्टीभागाला चांगलेच झोडपले आहे. वायू चक्रीवादळ जरी राज्याच्या किनारपट्टी भागापासून दूर गेले असली तरी त्याचा काहीसा परिणाम कोकण किनारपट्टी भागाला जााणवला. खवळलेला समुद्र उसळणाऱ्या लाटा, आलेली भरती आणि वेगान सुटलेला वारा यामुळे गणपतीपुळे किनाऱ्यावर असणारे स्टॉल जमीनदोस्त झाले आहेत.
किनारपट्टी भागात आज दुपारनंतर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी वाऱ्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे किनारपट्टी भागात काहीसे नुकसान झाले.
अनेक ठिकाणी किनाऱ्यावर लाटा आदळत आहेत. अद्यापही वाऱ्याची स्थिती तशीच आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला.