ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; २४ तासात १००.५६ मिमी पाऊस

मागील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. चिपळूणमध्ये सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी पाऊस
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:47 AM IST

Updated : Sep 4, 2019, 12:04 PM IST

रत्नागिरी - पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. चिपळूणमध्ये सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं

हेही वाचा - पावसामुळे ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरीतल्या काजळी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्याचा फटका जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्‍वर या गावांना बसला आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा - खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याला तीन ते चार वेळा पुराचा फटका सहन करावा लागला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, रत्नागिरीला बसला होता. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पावसाने मागील आठवड्यापासून बरसायला सुरवात केली आहे.

ऐन गणेशोत्सवात पाऊस पडत असल्याने चाकरमानी आणि गावकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. आज चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर पुन्हा जिल्ह्याला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा

२४ तासांत १००.५६ मिमी पाऊस

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी १००.५६ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडला असून चिपळूणमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल राजापूरमध्ये ११५ मिमी, खेडमध्ये ११०, दापोलीत १०५ मिलिमीटर, मंडणगडमध्ये ९५ मिमी आणि गुहागरमध्ये ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातही ८० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Intro:मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलं

24 तासांत 100.56 मिमी पाऊस

चिपळूणमध्ये सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या रौद्ररूपाचा फटका जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्‍वरला बसला आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्‍वरमध्येही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्याला तीन ते चार वेळा पुराचा फटका सहन करावा लागला होता. या पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं. याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, रत्नागिरीला बसला होता. हे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुन्हा एकदा आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गेले चार दिवस तर पावसाने कहरच केला आहे. ऐन गणेशोत्सवात ही मुसळधार बरसात सुरू असल्याने चाकरमानी, गावकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गणेशचतुर्थीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. आज चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या 48 तासात आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जर पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा जिल्ह्याला पुराचं फटका बसण्याची शक्यता आहे.

24 तासांत 100.56 मिमी पाऊस

दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 905 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 100.56 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडला असून चिपळूणमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 115 मिमी, खेडमध्ये 110, दापोलीत 105 मिलिमीटर , तर मंडणगडमध्ये 95 मिमी आणि गुहागरमध्ये 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातही 80 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे..Body:मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलं

24 तासांत 100.56 मिमी पाऊस

चिपळूणमध्ये सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंदConclusion:मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलं

24 तासांत 100.56 मिमी पाऊस

चिपळूणमध्ये सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंद
Last Updated : Sep 4, 2019, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.