ETV Bharat / state

मोबाईलवर गेम खेळल्यामुळे वडील ओरडल्याच्या रागातून मुलीने केली आत्महत्या

मोबाईलवर गेम खेळल्यामुळे वडील ओरडल्याच्या रागातून 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. मारिया आजिम दाऊद, असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

Girl commit suicide
शाळकरी मुलीची आत्महत्या
author img

By

Published : Jul 30, 2020, 12:23 PM IST

रत्नागिरी - मोबाईलवर गेम खेळल्यामुळे वडील ओरडल्याने मुलीने आत्महत्या केली. सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील १५ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मारिया आजिम दाऊद, असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मुलीच्या आत्महत्येची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील मारिया आजिम दाऊद ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्यासाठी ती घरातील मोबाईल वापरत होती. केवळ ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल वापरायचा अशी सक्त ताकीद तिच्या वडिलांनी दिली होती.

मंगळवारी मारिया मोबाईलवर गेम खेळताना वडिलांना दिसली. यापुढे मोबाईलवर गेम खेळू नको, असे सांगत त्यांनी तिला दम भरला होता. वडील ओरडल्याच्या रागातून मारियाने रात्रीच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घरातील नातेवाईक उठल्यानंतर मारियाचा शोध घेण्यात आला. यावेळी एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.