रत्नागिरी - जिल्ह्यात ठिकठिकाणी गौरींचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. आगमन कोकणातील महिला वेगळ्या पद्धतीने गौरींचे स्वागत करतात.
कोकणात पाणवठ्यावर गौरीच्या मुखवट्याची पुजा करुन गौरी घरी आणण्याची परंपरा आहे. स्थानिक भाषेत गौरीला 'गवर' असेही संबोधले जाते. गौरी घरी आणताना महिलावर्ग नाचत, गाणी गात फेर धरतात.
हेही वाचा - रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; चिपळूण, दापोलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस
कोकणात गौरीचे अनेक प्रकार पहायला मिळतात. साधी तेरड्याची, कागदी मुखवटा लावून टोपलीत बसलेली, पूर्णाकृती, खुर्चीवर बसलेली अशा वेगवेगळ्या रुपातील गौरी असतात. दरवर्षी गौरींना नव्या वस्त्रालंकारांनी सजवले जाते. कोकणात एक दिवस गौरीसाठी गोड तर एक दिवस तिखट नैवेद्य दाखवला जातो.