रत्नागिरी - गणपती विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन बाप्पांना निरोप देत आहेत. आज जिल्ह्यातील 37 हजाराहुन अधिक घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात आज 10 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांची मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
राज्यभरात आज गणपती विसर्जनाची धूम असून भाविक मोठ्या श्रद्धेने बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देत आहेत. ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत रत्नागिरीसह राजापूर, संगमेश्वर, लांजा, दापोली आणि गुहागरात मोठ्या संख्येने गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कोकणातल्या चाकरमान्यांसह अनेकजण या जल्लोषात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा - कोकणात बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग; घराघरांतून ऐकू येत आहे आरत्यांचे सूर