रत्नागिरी: बिकेसीवरील दसरा मेळाव्यात उद्योग मंत्री, तथा शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत Shinde group spokesperson Uday Samant यांनी भाषण केलं नव्हतं. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू होते. भाषणांमध्ये नाव 100 टक्के होतं, पण भाषण न करण्याचं कारण उदय सामंत Shinde group spokesperson Uday Samant यांनी सांगितलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
कोणी नाराज असण्याचे कारण नाही सामंत यांनी म्हटलं आहे की, बिकेसीवर शिवसेनेचा जो दसरा मेळावा झाला. त्यावेळी भाषणांमध्ये माझं नाव 100 टक्के होतं. सगळेच जर भाषण करत राहिले असते, तर 11 वाजले असते. त्यामुळे शिंदे साहेबांना मी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं, की खूप वेळ झालेला आहे. मी भाषण करत नाही. शेवटी भाषणं किती व्हायची हा देखील एक मुद्दा असतो. त्यामुळे कोणी नाराज असण्याचे कारण नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
चौपट गर्दी शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी होती दरम्यान शिंदे साहेबांनी त्यांची चांगली भूमिका मेळाव्यात मांडलेली आहे. परवाच्या मेळाव्यावरून खरी शिवसेना कोणाची आहे, हे देखील फायनल झालेलं आहे. शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसं बसू शकतात, हे रेकॉर्ड बीएमसीकडे आणि पोलिसांकडे देखील आहे. बिकेसीच्या तिन्ही ग्राऊंडवर किती खुर्च्या लावलेल्या होत्या, आणि आजूबाजूला किती लोकं होती. हे देखील रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. तिप्पट चौपट गर्दी शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी होती, असे उदय सामंत यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
शिंदे गट-उद्धव ठाकरे गट आमने-सामने आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्ये प्रतिसेनाभवन उभारण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट Shiv Sena Leader Uddhav Thackeray आमने सामने उभे राहिले आहेत. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांना चांगलच फैलावर घेतले आहे. कोल्ह्यांनी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरू केला आहे अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.