रत्नागिरी- लांजा शहरातील खावाडकरावाडीतील एका कुंपणाच्या तारेमध्ये बिबट्या आज सकाळी अडकला होता. या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे. मानवी वस्तीत घुसलेला हा बिबट्या कुपंणात तारेत अडकला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची यशस्वी सुटका करुन त्याला सुरक्षित अधिवासात सोडले.
लांजा येथील खावाडकरवाडीमध्ये चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भात शेतीला लागून असलेल्या कुंपणाच्या तारेमध्ये बिबट्या अडकला होता. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच परीक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, लांजा वनपाल सागर पाताडे, सुरेश उपरे व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. प्रसंगावधान राखत तासाभरात बिबट्याची तारेतून सुटका करण्यात आली आणि बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
हेही वाचा-वीज बिल माफीच्या प्रस्तावावर वित्त विभागात अंधार
वनविभागाने मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.