ETV Bharat / state

रत्नागिरीत नर्सिंगच्या पाच विद्यार्थिनींची कोरोनावर यशस्वी मात.. टाळ्यांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत - नर्सिगच्या विद्यार्थिनींची कोरोनावर यशस्वी मात

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील नर्सिंगच्या नऊ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या सर्व नऊ विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील 5 विद्यार्थिनींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या 5 जणींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

korona nursing discharge
रत्नागिरीत नर्सिंगच्या पाच विद्यार्थिनींची कोरोनावर यशस्वी मात.. टाळ्यांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत
author img

By

Published : May 27, 2020, 3:53 PM IST

रत्नागिरी - कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या जिल्हा रुग्णालयातील नर्सिंगच्या 5 विद्यार्थिनींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे या पाच विद्यार्थिनींना आज (बुधवार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यासह इतर डॉक्टर तसेच काही समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरीत नर्सिंगच्या पाच विद्यार्थिनींची कोरोनावर यशस्वी मात

गेले काही दिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये मुंबईतून आलेल्या व्यक्तींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशातच कोणतीही प्रवास हिस्ट्री नसलेल्या जिल्हा रुग्णालयातील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि जिल्हा प्रशासनही हादरलं. कारण कोरोनाने थेट आरोग्य विभागामध्येच शिरकाव केला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये सुरुवातीला काही विद्यार्थिनींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर आणखी काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आढळून आल्या. ही संख्या वाढत-वाढत 9 पर्यंत गेली.

गेल्या काही दिवसांपासून या सर्व नऊ विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील 5 विद्यार्थिनींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या 5 जणींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्टेलवरच त्यांना पुढचे काही दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली आहे.

दरम्यान आजपर्यंत एकूण 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे 109 रुग्ण अक्टिव्ह आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.