रत्नागिरी - आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामाचा मुहूर्त टळला आहे. सध्या समुद्र खवळलेला असुन वेगवान वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मासेमारी हंगामाचा मुहूर्त टळला; समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे हंगाम लांबणीवर पडणार - वादळसदृष्य परिस्थिती
साधारण १ ऑगस्टपासून दरवर्षी मासेमारी हंगाम सुरू होत असतो. यावर्षी मात्र मासेमारी उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. समुद्रात मासेमारीसाठी अनुकूल परिस्थिती नाही.
रत्नागिरी - आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामाचा मुहूर्त टळला आहे. सध्या समुद्र खवळलेला असुन वेगवान वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मासेमारी हंगामाचा मुहुर्त टळला
खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यामुळे हंगाम लांबणीवर पडणार
रत्नागिरी, प्रतिनिधी
आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामाचा मुहुर्त टळला आहे. कारण निसर्गानंच या मासेमारीला ब्रेक लावला आहे. समुद्र खवळलेला आहे, त्यात वेगवान वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी हंगाम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
गेले दोन महिने शासकीय नियमानुसार समुद्रात मासेमारीला जाण्यास बंदी असते. १ जून ते ३१ जुलै आशा दोन महिन्याच्या कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते. त्यानंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होतो. मात्र मासेमारीच्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी आज जिल्ह्यातील मच्छिमारी नौका समुद्रात झेपावल्या नाहीत. सध्या समुद्राला उधाणा आहे, खोलसमुद्रात वादळसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे ३ आँगस्टपर्यत खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असं आवाहन मत्स्य विभागाने मच्छिमारांना केलं आहे. १ आँगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरवात होते. मात्र समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे मासेमारीचा हा शासकीय मुहुर्त टळला आहे. त्यामुळे अनेक बंदरात आजही बोटी किनाऱ्याला विसावलेल्या पहायला मिळाल्या. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..