ETV Bharat / state

मँगोनेटसाठी यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी - आंबा निर्यात मँगोनेट प्रणाली न्यूज

हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेअंतर्गत यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले आहे. आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५ पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली.

आंबा निर्यात मँगोनेट प्रणाली न्यूज
आंबा निर्यात मँगोनेट प्रणाली न्यूज
author img

By

Published : Jan 30, 2021, 2:50 PM IST

रत्नागिरी - हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेअंतर्गत यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले आहे.

मँगोनेटसाठी यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी
आंबा परदेशात निर्यात व्हावा यासाठी मँगोनेट प्रणाली

आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५ पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली. हापूसला उत्तम दर मिळावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मँगोनेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. ग्रेप्सनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी मँगोनेटचा पर्याय सहा वर्षापूर्वी निवडण्यात आला. नोंदणीदरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे, त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेतले जाते. सन २०१४-१५ पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. तर, दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आंबा परदेशात निर्यात केला जातो. दरम्यान, युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन पाहणी करून आंब्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दर मिळाला होता.

हेही वाचा - हापूस आंब्याची पुण्यात दमदार एन्ट्री, पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजारांचा भाव

४ हजार ५६६ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी

यावर्षी मँगोनेट सुविधेअंतर्गत ४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली असून, चिपळूण तालुक्यातील २९१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर दापोलीतील १२६ शेतकऱ्यांनी, गुहागर तालुक्यातील ३५, खेड तालुक्यातील एक हजार पाच, लांजा तालुक्यातील ९५, मंडणगड तालुक्यातील १ हजार ३०, राजापूर तालुक्यातील २६५, रत्नागिरी तालुक्यातील ५२२, संगमेश्वर तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांनी अशा एकूण ४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर, यावर्षी ३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी मँगोनेट प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले. दरम्यान मँगोनेटअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे.

हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडू अण्णा हजारे यांच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.