ETV Bharat / state

Ramdas kadam on Maratha Reservation : एकही मराठा हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही - रामदास कदम - Kunabi Certificate

Ramdas kadam on Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ते राज्यात विविध ठिकाणी जाऊन जाहीरसभा घेत आहेत. त्यांच्या सभेला मोठ्या संख्येनं लोक जमा होत आहेत. मराठयांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) द्या, या जरांगेंच्या मागणीच्या मी विरोधात आहे, असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

Ramdas kadam on Maratha Reservation
रामदास कदम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:32 PM IST

प्रतिक्रिया देताना रामदास कदम

रत्‍नागिरी : Ramdas kadam on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका लावला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. परंतु कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं रामदास कदम (Ramdas kadam) यांनी स्पष्ट केलं आहे. ते शनिवारी खेडमध्ये बोलत होते.

जरांगेंचा अभ्यास नाही : यावेळी रामदास कदम म्हणाले की, जरांगे यांनी जी मागणी केली, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) द्या, माझी याला मान्यता नसून मी या विरोधात आहे. विदर्भामध्ये कुणबी-मराठा चालतं सगळं, पण कोकणामध्ये रोटी-बेटीचा व्यवहार देखील चालत नाही, याची कल्पना जरांगेंना नाहीय. त्यांचा कोकणचा, सर्व महाराष्ट्राचा तेवढा अभ्यास नाहीये.

कोणाचे आमदार अपात्र होतील? : आमदार अपात्रता प्रकरणी बोलताना रामदास कदम म्हणाले की, कोणाचे आमदार अपात्र होतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. मागील दहा महिने हा विषय सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतोय. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी अध्यक्ष का करत नाहीत, असा प्रश्न सर्वाना पडलेला आहे. याच्या आधी कुठल्याही न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप केला नव्हता. मात्र सध्या सातत्याने सर्वोच्च न्यायालय हे अध्यक्षांना आदेश देत आहे, आता अंतिम टप्प्यात ही लढाई आलेली आहे. अंतिम टप्प्यात हा निकाल आलेला आहे, माझं आडनाव काही जोशी नाहीय, त्यामुळे जो निकाल येईल तो मला काही सांगता येणार नाही. तसेच अध्यक्षांवर अविश्वास दाखवून, त्यांना आशा गोष्टी बोलणे हे अशोभनीय नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीय.

घोडामैदान लांब नाहीये : ते पुढे म्हणाले की, कदाचित उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला, तर एकनाथ शिंदे हे न्यायालयात जातील आणि जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, तोच निर्णय जर अध्यक्षांनी घेतला, तर उद्धव ठाकरे यांचे 15 आमदार अपात्र होतील, असं मला वाटतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. आता घोडा मैदान लांब नाहीये, 'दूध का दूध, पाणी का पाणी बहुत जलदी हो जायेगा', अध्यक्षांना माझी विनंती आहे की, एकदाचा हा खेळ संपवून टाका, काय तो निकाल देऊन टाका, कोणाला हायकोर्टात जायचं असेल, सुप्रीम कोर्टात जायचं असेल, कोणाला घरी बसायचं आहे ते बसतील. पण अध्यक्षांच्या कामामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही.

हेही वाचा -

Manoj Jarange Patil : चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? मनोज जरांगे पाटलांचा सवाल

Maratha Reservation Protest : 'कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी घ्यावं, अन्यथा...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे? वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil Sabha Video : 'मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार; इंचभर मागं हटणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.