रत्नागिरी - पुन्हा एकदा जामदा धरणाचे रखडलेले काम सुरू झाले आहे. मात्र, पुनर्वसनाच्या कामामध्ये जरासुद्धा प्रगती झलेली नाही. तरीदेखील आता नव्याने काम सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत धरणाचे काम पूर्णत: थांबवावे, अशी मागणी करत ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील ज्या धरणांची एसीबीकडून चौकशी सुरू होती, त्यामध्ये राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प देखील होता. 300 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करूनही 40 टक्के देखील काम पूर्ण झालेले नव्हते. 2015 साली या धरणाच्या कामाची चौकशी सुरू झाली होती.
हेही वाचा - व्यापाऱ्याचे अपहरण करुन रोकड लुटणाऱ्या पुण्यातील टोळीला अटक; दिड कोटीचा मुद्देमाल जप्त
नवीन काम सुरू करण्याबाबत शासनाचा जो निर्णय आहे तो आम्हाला निदर्शनास आणून द्या, या मुख्य मागणीसाठी ग्रामस्थ रविवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रदीप शांताराम चंदूरकर, चंद्रकांत राजाराम शिंदे, मनोहर धोंडू राणे, संभाजी पांडुरंग गुरव, गणेश धोंडू गुरव हे आमरण उपोषणाला बसले आहेत. पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच, यापुढे तीव्र आंदोलन करून प्रकल्पाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून, आम्हाला विचारत न घेता काम सुरू असल्याचा आरोप करत ठेकेदाराविरोधात तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रकल्पग्रस्तांसमोर अडचणींचा डोंगर
धरनाच्या बुडीत क्षेत्रातील सुरुवातीला जी 704 कुटुंब विस्थापित होणार होती, त्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही (आता कुटुंबसंख्या वाढलेली आहे). त्यामुळे, आता अडचणींचा डोगर उभा राहिलेला आहे. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हेही वाचा - Nilesh Rane allegations over Nawab Maliks : नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंट मॅन असू शकतात - निलेश राणे