ETV Bharat / state

तिवरे धरण खरंच खेकड्यांनी फोडल का? ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले.

तिवरे धरण
author img

By

Published : Jul 15, 2019, 12:00 AM IST

रत्नागिरी - तिवरे धरण फुटले आणि संपूर्ण राज्य हादरून गेले. पण जलसंधारण राज्यमंत्री मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्या भोवती गेले १२ दिवस या दुर्घटनेचे राजकारण फिरत आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. पण खरंच खेकड्यांनी धरण फोडले असावे का? स्थानिकांचे आणि खेकडा अभ्यासकांचे नेमके काय म्हणणे आहे. पाहूया याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.

ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. एकेका कुटुंबातील 5 ते 6 जण धरणाच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले ते कायमचेच. पण खेकड्यांनी धरणाला भगदाड पाडल्यामुळे हे धरण फुटल्याच्या जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघाले. विरोधकांनाही सावंत यांच्या वक्तव्यामुळे आयते कोलीत मिळाले. पण खेकड्यांनी भगदाड पाडलं आणि धरण फुटलं ही बाब स्थानिकांनाही काही पटत नाही.

जगामध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 1280 जाती आढळतात. भारतात गोड्या पाण्यातील 96 प्रकारचे खेकडे आढळतात. यापैकी ब्यरीटेलफुसा कुनीकुलारीस ही जात लोकप्रिय असून महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये आढळते. पण गोड्या पाण्यात आढळणारा हा खेकडा चालणारा असतो, तो पोहणारा नसतो. गोड्या पाण्यातील खेकडा हा जास्तीत जास्त 300 ते 500 ग्रॅम पर्यंत वाढतो. समुद्र किंवा खाडीतील खेकडे मोठ्या प्रमाणात बिळ पाडतात. ते खूप लांबपर्यंत बिळ पाडू शकतात. त्यामानाने गोड्या पाण्यातील या खेकड्यांची शक्ती देखील कमी असते. तो जास्तीत जास्त 3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडू शकतो. पण गोड्या पाण्यातील खेकड्यांमुळे धरण फुटले असे आजपर्यंत तरी ऐकिवात नसल्याचे या विषयातील तज्ञ सांगतात.

गोड्या पाण्यातील खेकडे 3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडतात. त्यामुळे हे खेकडे धरणाला एवढे मोठे भगदाड पाडणे शक्य नाही. त्यामुळे हे धरण प्रशासनातील खेकड्यांमुळे फुटले. ज्या खेकड्यांनी स्थानिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले नाही अशा खेकड्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे.

Intro:खरंच खेकड्यांनी धरण फोडलं ?

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिवरे धरण फुटलं आणि संपूर्ण राज्य हादरून गेलं. पण जलसंधारण राज्यमंत्री मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्या भोवती गेले 12 दिवस या दुर्घटनेचं राजकारण फिरत आहे.. सोशल मीडियावरही या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. पण खरंच खेकड्यांनी धरण फोडलं असावं का? स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे.. खेकडा अभ्यासकांचं नेमकं काय म्हणणं आहे.. पाहूया याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट...

Vo.. 1..

2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं.. आणि 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले.. एकेका कुटुंबातील 5 ते 6 जण धरणाच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले ते कायमचेच.. पण खेकड्यांनी धरणाला भगदाड पाडल्यामुळे हे धरण फुटल्याच्या जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघालं.. विरोधकांनाही सावंत यांच्या वक्तव्यामुळे आयतं कोलीत मिळालं. सोशल मीडियावरही या वक्तव्याचे धिंडवडे काढण्यात आले.. पण जिथे पाणी तिथे जलचर हे असणारच.. तिवरे धरणातही मासे, खेकडे, बेडूक होते.. पण खेकड्यांनी भगदाड पाडलं आणि धरण फुटलं ही बाब स्थानिकांनाही काही पटत नाही..
Byte.. तानाजी चव्हाण, ग्रामस्थ

Vo. 2.. जगामध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 1280 जाती आढळतात.. भारतात 96 प्रकारचे गोड्या पाण्यातील खेकडे आढळतात.. ब्यरीटेलफुसा कुनीकुलारीस ही जात लोकप्रिय असून महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये आढळते.. पण गोड्या पाण्यात आढळणारा हा खेकडा चालणारा असतो, तो पोहणारा नसतो. गोड्या पाण्यातील खेकडा हा जास्तीत जास्त 300 ते 500 ग्रॅम पर्यंत वाढतो. समुद्र किंवा खाडीतील खेकडे मोठ्या प्रमाणात बिळ पाडण्याचं प्रमाण मोठया प्रमाणात असतं, ते खूप लांबपर्यंत बिळ पाडू शकतात. त्यामानाने गोड्या पाण्यातील या खेकड्याची शक्ती देखील कमी असते, तो जास्तीत जास्त 3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडू शकतो.. पण गोड्या पाण्यातील खेकड्यांमुळे धरण फुटलं असं आजपर्यंत तरी ऐकिवात नसल्याचं या विषयातील तज्ञ सांगतात.
Byte - डॉ. एस. डी. नाईक, तज्ञ अभ्यासक - मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी

Vo. 3..

3 ते 4 फुटापर्यंत बिळ पाडणारे गोड्या पाण्यातील हे खेकडे धरणाला एवढं मोठं भगदाड पाडतील हे शक्य नाही. त्यामुळे हे धरण फुटलंय ते प्रशासनातील खेकड्यांमुळे. ज्या खेकड्यांनी स्थानिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे आधी अशा खेकड्यांचा वठणीवर आणणं आवश्यक आहे...Body:खरंच खेकड्यांनी धरण फोडलं ?Conclusion:खरंच खेकड्यांनी धरण फोडलं ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.