ETV Bharat / state

Vinayak Raut On Shinde Group : लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच 'मिंधे गटात मोठा भूकंप' - खासदार विनायक राऊत यांचा दावा - लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटात मोठा भूकंप

Vinayak Raut On Shinde Group : ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटातील बरेच जण संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटात मोठा भूकंप होणार आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Vinayak Raut On Shinde Group
शिंदे गटात मोठा भूकंप होईल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 7:44 PM IST

Updated : Oct 16, 2023, 8:05 PM IST

रत्‍नागिरी Vinayak Raut On Shinde Group : विनायक राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन, उद्धव साहेबांची माफी मागायची आहे, अशा पद्धतीचे निरोप शिंदे गटातील (Eknath Shinde Group) अनेकांचे आहेत असा गौप्यस्फोट विनायक राऊत यांना केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटात मोठा भूकंप होईल असं भाकीत राऊत (Vinayak Raut) यांनी वर्तवलं आहे. ते आज रत्‍नागिरीत (Ratnagiri News) बोलत होते.

शिंदे गटामध्ये होणार जबरदस्त भूकंप : यावेळी बोलताना म्हणाले की, ज्या 13 खासदारांनी बेईमानी केली, गद्दारी केलेली आहे, त्यांच्यापैकी जास्तीत जास्त 3 जणांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल. बाकीच्या 10 जणांचं विसर्जन 100 टक्के होणार आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येत आहेत, पण ते कोणाकोणाचे आहेत ते मी आता सांगणार नाही. परंतु शिंदे गटामध्ये जबरदस्त भूकंप होणार आहे.

फेब्रुवारीला आचारसंहिता जाहीर होईल, त्याच्या अगोदरच हा भूकंप होईल. आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येऊन, उद्धव साहेबांची माफी मागायची आहे, अशा पद्धतीचे निरोप बरेच आहेत. - विनायक राऊत,खासदार

इंडिया आघाडीसमोर सर्वांचा सुपडा साफ होईल : गद्दारांनी उद्धव ठाकरेंना शहाणपण शिकवू नये, 2024 ला इंडिया आघाडीलाच (INDIA Alliance) महाराष्ट्रासह देशात यश मिळेल. मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत, त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल. इंडिया आघाडीसमोर सर्वांचा सुपडा साफ होईल, असंही खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Vinayak Raut on Election : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागणार; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं भाकीत
  2. Vinayak Raut On Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात - विनायक राऊत
  3. Nitesh Rane Attack On Vinayak Raut खासदार विनायक राऊत हे आमचे ऑफिस बॉय कधी झाले, आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल

माहिती देताना खासदार विनायक राऊत

Last Updated : Oct 16, 2023, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.