ETV Bharat / state

Ajit Pawar In Ratnagiri : कुणी कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय.. अजित पवारांनी राणे, मलिकांना सुनावले - MLA Nitesh Rane

भाजप आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा सोशल मीडियावर वाद रंगला ( Nawab Malik Vs Nitesh Rane) आहे. राणे यांनी मांजराचा आवाज काढत विधानभवनासमोर मंत्री आदित्य ठाकरेंना चिडवले होते. त्यावर मलिक यांनी कोंबडी आणि मांजराचा फोटो ट्विट केला होता. या दोघांच्या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली ( Ajit Pawar Advice To Nitesh Rane Nawab Malik ) आहे. या दोघांनाही पवारांनी खडेबोल सुनावले आहेत.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Dec 26, 2021, 8:39 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar In Ratnagiri ) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांना ( Nawab Malik Vs Nitesh Rane) नाव न घेता खडेबोल सुनावले आहेत. एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा विकासावर काय ते बोला, असा सल्लाच पवारांनी या दोघांना नाव न घेता दिला ( Ajit Pawar Advice To Nitesh Rane Nawab Malik ) आहे.

कुणी कोंबड्याला मांजर करतंय, तर कुणी मांजराला कोंबडा करतंय.. अजित पवारांनी राणे, मलिकांना सुनावले

कुणी कोंबड्याला मांजर करतंय तर कुणी मांजराला कोंबडा करतंय

अजित पवार म्हणाले की, आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे नेते आहोत. सध्या सोशल मीडियावरून कोण कोंबड्याला मांजर करतंय तर कुणी मांजराला कोंबडा करतंय यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? हे असं कुणीच करू नये असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांना खडे बोल सुनावले आहेत. एकमेकांची उणीदुणी काढून काही होणार नाही, आपण विकासावर काय ते बोलले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्याला आई वडिलांनी जन्म दिल्याचं सार्थक होईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांना टोला लगावला आहे. रत्नागिरी जवळच्या मिर्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

काय आहे राणे - मलिक प्रकरण ?
गुरुवारी विधानसभेचे कामकाज ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) सकाळी 11 वाजता कामकाज सुरु होण्याअगोदर विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून भाजपा आमदार सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. त्याच दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात आले असता, विरोधकांनी म्याऊ- म्याऊ- म्याऊ- म्याऊ अशा घोषणा देत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आमदार नितेश यांनी हा शब्द अगोदर उच्चारला व त्याला इतर आमदारांनी साथ दिली ( Nitesh Rane Teased Aaditya Thackeray ). यावेळी भाजपाचे नेते हसताना पाहायला मिळाले. त्यानंतर आता मलिक यांनी कोंबडा आणि मांजर असलेला फोटो ट्विट करत अप्रत्यक्षपणे राणेंवर निशाणा साधला होता.

हेही वाचा : नवाब मलिकांनी ट्विट केला मांजराचा चेहरा आणि कोंबड्याचं शरीर असलेला फोटो.. म्हणाले पैहचान कौन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.