रत्नागिरी - जिल्हा रुग्णालयातील एक महिला वैद्यकीय अधिकारी कोरोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती आज (शुक्रवारी) समोर आली. या महिला डॉक्टरने आपले नमुने घेतले गेले. मात्र, ते नमुने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सॅम्पल पुण्याला पाठवले नाहीत, असा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे. याबाबतची तक्रार या महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली होती. तर या महिला डॉक्टरने केलेले सर्व आरोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी फेटाळून लावले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले, या साऱ्या प्रकारामध्ये तथ्य नाही. ज्यावेळी संबंधित डॉक्टरने या साऱ्या प्रकाराची मला कल्पना दिली, तेव्हा आम्ही तातडीने पावले उचलली. मात्र, त्यानंतर या महिला डॉक्टरकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी केलेला आरोप खोटा आहे. तसेच संबंधित डॉक्टरला रुग्णालयात 'क्वारन्टाईन' होण्यासाठी विनंती केली होती. मात्र, त्या गायब झाल्या आणि रात्री उशिरा रुग्णालयात आल्या. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यावेळी देखील या महिला डॉक्टरला क्वारन्टाईन होण्यासाठी सांगितले होते. मात्र, त्या क्वारन्टाईन झाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
हेही वाचा - बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू
दरम्यान, या महिला डॉक्टरचे स्वाब तपासणीसाठी पुण्याला पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.