ETV Bharat / state

अंगारकी चतुर्थी : कोरोना जाऊदे, ST कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघूदे; भाविकांचं गणपतीपुळेच्या 'श्रीं'कडे साकडे - गणपतीपुळे भाविकांची गर्दी

अंगारक चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गणपतीपुळेत(Ganpatipule Temple) श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र, सध्या राज्यात एसटी संप सुरू असल्यामुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे.

Ganpatipule
गणपतीपुळे मंदिर
author img

By

Published : Nov 23, 2021, 4:32 PM IST

Updated : Nov 23, 2021, 6:16 PM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी मंदिरं उघडली आहेत. या वर्षीच्या शेवटच्या अंगारक चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गणपतीपुळेत(Ganpatipule Temple) श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकर तोडगा निघूदे, असं साकडं गणपतीपुळेतील श्रींच्या चरणी आज भाविकांनी घातल्याचं पाहायला मिळालं.

प्रतिक्रिया देताना भाविक

एसटी संपाचा भाविकांना फटका -

या अंगारक चतुर्थीला भाविकांना एसटी संपाचा फटका बसला आहे. त्यात अद्यापही असलेली कोरोनाची भिती, त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावलेली पाहायला मिळाली.

Ganpatipule
गणपतीपुळे मंदिर

दरवर्षी अंगारक चतुर्थीसाठी शेकडो एसटीच्या बसेस गणपतीपुळे इथं भाविकांना घेवून येत असतात. मात्र, एसटी संपाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर झाला आहे. भाविकांना घेऊन येणाऱ्या एसटी बसेस यावर्षी आल्याच नाहीत. त्यामुळे यावर्षी जवळपास 40 ते 50 टक्के भाविकांची संख्या घटल्याचं पाहायला मिळालं.

Last Updated : Nov 23, 2021, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.