ETV Bharat / state

मत्स्यविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला; १९९८ नंतरच्या १५०० मुलांची पदवीच अवैध?

१९९८ सालापासून शिरगाव मत्स्य महाविद्यालयातून जवळपास १५०० विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडलेत. अशात आता आपण घेतलेले शिक्षण वाया जाईल या भितीने सध्या ही मुले अनेक मार्ग चाचपडतायेत

मत्स्यविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला
author img

By

Published : May 6, 2019, 6:14 PM IST

रत्नागिरी - कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य महाविद्यालयाची पदवी घेतलेले सर्वच विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. याला कारण आहे त्यांची पदवी अवैध ठरणार आहे. त्यामुळे १९९८ सालापासून ज्यांनी इथून पदवी घेतली आहे त्यांच्यासमोर आता नेमके करायचे काय? असा प्रश्न 'आ'वासून उभा आहे. १९९८ मध्ये राज्य सरकारने एक कायदा आणला, त्यात माफसू ( महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ) नागपूर यांनाच मत्स्य शास्त्रासंदर्भातील पदवी देण्याचा अधिकार देण्यात आला.

मात्र, महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे २००६ पर्यंत कुठलेही मत्स्य महाविद्यालय नव्हते. नंतर नागपूर आणि उदगिर इथे मत्स्य महाविद्याल काढण्यात आले. मात्र, १९९८ च्या अध्यादेशाचा आधार घेवून नागपुरातील ५ जणांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. यात कोकण कृषी विद्यापिठा अंतर्गत येणाऱ्या शिरगावातील मत्स्य महाविद्यालयातील डीग्रीला आव्हान दिले गेले.

मत्स्यविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला

२०१८ मध्ये ही याचिका दाखल केली गेली आणि नागपूर खंडपीठाने २४ एप्रिलला याचा निकाल देताना सरकारने या महाविद्यालयातून दिलेल्या पदव्यासंदर्भात अध्यादेश काढून कायदा करावा अथवा या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या पदव्या अवैध ठरवाव्यात, अशा सूचना राज्य सरकाला दिल्या. त्यामुळे आपली शैक्षणिक मेहनत फुकट जाणार की काय या विचाराने अनेक विद्यार्थी धास्तावले आहेत.

१९९८ सालापासून शिरगाव मत्स्य महाविद्यालयातून जवळपास १५०० विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडलेत. अशात आता आपण घेतलेले शिक्षण वाया जाईल या भितीने सध्या ही मुले अनेक मार्ग चाचपडतायेत. त्यामुळे रत्नागिरी जवळच्या शिरगावमधील मत्स्य महाविद्यालयातील मुलांशी आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी चर्चा केली. उदय सामंत यांनी फोनवरून या मुलांचा संवाद शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी करून दिला. शिक्षण मंत्र्यांनी येणाऱ्या जूनच्या अधिवेशनात आचारसंहिता संपल्यावर सरकार या संदर्भात वेगळा कायदा करेल, अध्यादेश आणेल आणि कोकण कृषी विद्यापिठातील मत्स्य महाविद्यालयातील मुलांना दिलासा दिला जाईल असे सांगितले.

Intro:मत्स्यमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं भवितव्य लागलंय पणाला

१९९८ नंतरच्या १५०० मुलांचं भवितव्य आता सरकारच्या हातात

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत मत्स्य महाविद्यालयाची ड्रिगी घेतलेले सर्वच जण विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. याला कारण त्यांची डीग्रीच अवैध ठरणार आहे. त्यामुळे १९९८ सालापासून ज्यांनी इथून डीग्री घेतलीय त्यांच्यासमोर करायचं काय असा यक्ष प्रश्न आवआसून उभा आहे. काय आहे हा सारा प्रकार पाहूया

व्हिओ-१- रत्नागिरी जवळच्या कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या मत्स्य महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारी ही प्रांजली.. एकीकडे शेवटच्या वर्षांची परीक्षा होईल, तर दुसरीकडे ही डिग्री अवैध ठरली तर करायचं काय.. असा प्रश्न तिच्यासमोर आहे.. कारण सरकारी अनास्था... १९९८ मध्ये राज्य सरकारने एक कायदा आणला, त्यात माफसू( महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठ) नागपूर यांनाच मत्स्य शास्त्रासंदर्भातील पदवी देण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाकडे २००६ पर्यत कुठलेही मत्स्य महाविद्यालय नव्हते. मात्र नागपूर आणु उदगिर इथं मत्स्य महाविद्याल काढण्यात आले. तो पर्यत काहीच फरक पडत नव्हता. मात्र १९९८ चा अध्यादेशाचा आधार घेवून नागपूरातील पाच जणांनी नागपूर खंडपिठात एक याचिका दाखल केली. यात कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या शिरगावातील मत्स्य महाविद्यालयातील डीग्रीना आव्हान दिलं गेलं. २०१८ मध्ये हि याचिका दाखल केली गेली आणि नागपूर खंडपिठाने २४ एप्रिलला याचा निकाल देताना सरकारने या महाविद्यालयातून दिलेल्या पदव्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढून कायदा करावा अथवा या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या पदव्या अवैध ठरवाव्यात अशा सुचना राज्य सरकाला दिल्या. त्यामुळे आपली शैक्षणिक मेहनत फुकट जाणार की काय या धास्तीने अनेक विद्यार्थी म्हणुन धास्तावलेत.

बाईट-1- प्रांजली. मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी

व्हीओ..२..

१९९८ सालापासून वर्षाला ६० तेे ७० मुलांनी शिरगाव मधल्या मत्स्य महाविद्यालयातून डीग्री घेवून बाहेर पडलेत. म्हणजे जवळपास १५०० मुलांच्या डोक्यावर आपण शिक्षण घेवून मिळवलेली पदवी अवैध होईल अशी भिती इथं शिकणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनात आहे. त्यामुळे सध्या परिक्षा डोक्यावर असताना आपण घेत असलेलं शिक्षणाचा बट्याबोळ तर होणार नाही ना याची चिंता इथल्या मुलांच्या चेहऱ्यावर सष्ट दिसतेय. त्यामुळेच आपण घेतलेलं शिक्षण वाया जाईल या भितीने सध्या हि मुलं अनेक मार्ग चाचपडतायत. त्यामुळे रत्नागिरी जवळच्या शिरगाव मधील मत्स्य महाविद्यालयातील मुलांशी चर्चा केली आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी. उदय सामंत यांनी फोनवरून या मुलांचा संवाद शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी करून दिला. शिक्षण मंत्र्यांनी येणाऱ्या जूनच्या अधिवेशनात आचारसंहिता संपल्यावर सरकार या संदर्भात वेगळा कायदा करेल अध्यादेश आणेल आणि कोकण कृषी विद्यापिठातील मत्स्य महाविद्यालयातील मुलांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं.

बाईट-२- विनोद तावडे. फोनवरून मुलांशी ंसंवाद साधताना (आँडिओ बाईट आहे)

व्हिओ-३- ंमुळात मत्स्य विद्यापिठ नागपूर विद्यापिठा अंतर्गत घेण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन सध्या १९९८ पासूनच्या मत्स्य महाविद्यालयातील डीग्री अवैध ठरवून कोकणातील मत्स्य विद्यापिठ नागपूरात हलवण्याच्या हालचालीचा डाव आखला जातोय. काही करोड रुपये मत्स्य महाविद्यालयाच्या फंडीगसाठी येतात. त्यामुळे कुठल्याहि परिस्थितीत मत्स्य महाविद्यापीठ नागपूरला जोडलं जाणार नसल्याचं आमदार उदय सामंत यांनी सष्ट केलंय.

बाईट-३- उदय सामंत. आमदार रत्नागिरी

व्हिओ-४- रत्नागिरीमधील शिरगावमधील मत्स्य महाविद्यालय १९८१ साली स्थापन झालंय.कोकण कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील १९९८ नंतरच्या पंधराशे मुलांचं भवितव्य मात्र आज सर्वस्वी सरकारच्या हातात रहाणार आहे.Body:मत्स्यमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं भवितव्य लागलंय पणाला

१९९८ नंतरच्या १५०० मुलांचं भवितव्य आता सरकारच्या हातात
Conclusion:मत्स्यमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं भवितव्य लागलंय पणाला

१९९८ नंतरच्या १५०० मुलांचं भवितव्य आता सरकारच्या हातात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.