रत्नागिरी - लांजा शहरातील डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे लोकार्पण शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार राजन साळवी यांच्या विशेष प्रयत्नांनी जिल्हा वार्षिक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत २४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यातून लांजा शहरातील सांस्कृतिक भवन येथे २४ बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान
यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, जिल्हा खनिकर्म विभागाने एक रुग्णवाहिका दिली. ती लांजा रुग्णालयाचे डॉ. पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख संदीप दळवी, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, विभागप्रमुख शरद चरकरी आदींसह पदाधिकारी लोकप्रतीनिधींनी मेहनत घेतली.
हेही वाचा - कोरोनाशी झुंज देत असलेल्या त्या नवजात बालकाचा मृत्यू