रत्नागिरी - कोकणात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी चांगलीच पडू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं किमान तापमान आज १९ अंश सेल्सिअस होतं. तर मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील दापोलीचा पारा आणखीनच घसरला आहे. दापोलीचा पारा आज ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. त्यामुळे दापोली सध्या गारठली आहे.
दापोली गारठली

दापोलीचा पारा गेले काही दिवस घसरलेला आहे. गेल्या चार दिवसांचा दापोलीचा विचार केला तर २० तारखेला दापोलीचा पारा १२.५ अंश सेल्सिअस, २१ तारखेला १०.४ अंश सेल्सिअस, २२ तारखेला ८.९ अंश सेल्सिअस, २३ तारखेला ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत दापोलीचा पारा घसरला आहे.
हेही वाचा - 'नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ'
दिवसभर गार वारा
दरम्यान संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. दिवसभर सुटणाऱ्या गार वाऱ्यामुळे दिवसभर गारठा जाणवतो. झोंबणारा गार वारा आणखी थंडीत भर घालत आहे. कमी झालेली थंडी पुन्हा सुरु झाल्यानं अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्या जातायत. तर अनेकजण मैदानावरती उतरलेले पहायला मिळतायत. तर या थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी देखील दापोलीची वाट धरलीय.मोठ्या प्रमाणात पर्यटक दापोलीसह कोकणात दाखल झाले आहेत.
हेही वाचा - देवरुखजवळच्या हातीवमध्ये बिबट्याचा भूकबळी; गोठ्यात मृत्यू