ETV Bharat / state

मजुरांना आपल्या गावी जाण्याची ओढ, परवानगीसाठी गर्दी - corona ratanagiri

जिल्ह्यातील दापोलीत देखील सध्या मजुरांनी परवानगीसाठी गर्दी केली आहे. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे शेकडो मजूर आरोग्य तपासणी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत.

दापोली
दापोली
author img

By

Published : May 3, 2020, 5:10 PM IST

रत्नागिरी - परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यास आता परवानगी दिली जात आहे. काही रेल्वे देखील त्याप्रमाणे सोडण्यात आल्याने त्यातून हजारो मजूर त्यांच्या गावी दाखल झाले. त्यानंतर आता राज्यातील अनेक ठिकाणी परप्रांतीय मजुरांची संबंधित यंत्रणेकडे परवानगीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत देखील सध्या मजुरांनी परवानगीसाठी गर्दी केली आहे. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे शेकडो मजूर आरोग्य तपासणी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. उन्हा-तान्हाची पर्वा न करता हे मजूर सध्या रांगेत उभे असून त्यांना गावी जाण्याची आस लागली आहे. यावेळी आम्हाला गावी जाण्यास परवानगी केव्हा मिळणार? आमची गावी जाण्याची व्यवस्था कशी केली जाणार आहे? असे प्रेश्न हे मजूर विचारत आहेत. एकंदरीत सध्या सारी परिस्थिती पाहता या मजुरांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.