ETV Bharat / state

शिथिलता मिळताच रत्नागिरीतील बाजारपेठात गर्दी - रत्नागिरीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ

रत्नागिरी जिल्हा आँरेंज झोनमध्ये येतो, त्यामुळे जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात शिथिलता देण्यात आलीय. मात्र, शिथिलता देण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच रत्नागिरीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली.

बाजार पेठेतील वर्दळ
बाजार पेठेतील वर्दळ
author img

By

Published : May 4, 2020, 5:19 PM IST

Updated : May 4, 2020, 7:42 PM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, आजपासून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा आँरेंज झोनमध्ये येतो, त्यामुळे जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात शिथिलता देण्यात आलीय. मात्र, शिथिलता देण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच रत्नागिरीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतील गोखलेनाका परिसरात तर मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा झाल्याचे पहायला मिळाले. बाजारपेठेतील तुरळक दुकाने उघडलेली पहायला मिळाली.

रत्नागिरीत या आहेत अटी
आढावा घेतलाना प्रतिनिधी

- परवानगी दिलेल्या चारचाकी वाहनामध्ये एक वाहन चालक व दोन व्यक्ती यांना प्रवासाची मुभा राहील , तसेच दुचाकीवर केवळ चालकास प्रवासाची मुभा राहील.

- नगरपालिका हद्दीतील मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि बाजारपेठा बंद राहतील (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून)

- नगरपालिका हद्दीमध्ये सर्व प्रकारची दुकाने अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली, असा भेदभाव न करता) जी गर्दीत थाटलेली नसून केवळ एकटेपणाने (Single) आस्तित्वात आहेत, ती सुरू ठेवणेस मुभा राहील.

- अत्यावश्यक असलेल्या व अत्यावश्यक नसलेल्या सेवा पुरविणारी ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने (मॉल वगळून) उघडी राहतील.

- सर्व शासकीय व खासगी कार्यालय त्यांचे 33 टक्के कर्मचारी संख्येच्या मर्यादेत उपस्थितीने सुरू ठेवता येतील.

- प्रवासी वाहतूकीची वाहने एक वाहन चालक व दोन प्रवासी, अशा पध्दतीने सुरू ठेवता येतील.

- आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, जिल्हादंडाधिकारी यांचे परवानगीशिवाय होणार नाही.

- लग्न समारंभात जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी राहील . मात्र, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.

- अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 लोकांपर्यंत परवानगी असेल.

- मद्य विक्री दुकाने पूर्वपरवानगीने सुरु ठेवता येतील. मात्र मद्य विक्री करताना एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानाजवळ उपस्थित राहणार नाहीत व प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील, याची दक्षता घेणे आवश्यक राहील.

- पानटपरी व तंबाखूची दुकाने पूर्णपणे बंद राहतील तसेच अन्य दुकानांतून पान, तंबाखू विक्री करता येणार नाही.

हेही वाचा - मजुरांना आपल्या गावी जाण्याची ओढ, परवानगीसाठी गर्दी

Last Updated : May 4, 2020, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.