ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात - corona virus lockdown effect on mango farming

जगभर थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फटका राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसायाला देखील बसला आहे. शेकडो कोटींची आर्थिक उलाढाल या दोन व्यवसायांमधून होत असते. मात्र, सध्या हे दोन्ही व्यवसाय ठप्प आहेत.

corona-virus-lockdown-effect-on-mango-farming-and-fishing-business
राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
author img

By

Published : Apr 9, 2020, 3:36 PM IST

रत्नागिरी - जगभर थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फटका राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसायाला देखील बसला आहे. शेकडो कोटींची आर्थिक उलाढाल या दोन व्यवसायांमधून होत असते. मात्र, सध्या हे दोन्ही व्यवसाय ठप्प आहेत. मच्छीमारी व्यवसाय तर जवळपास पुर्णतः ठप्प आहे. तर आंबा तयार होतोय मात्र, शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत. आंबा काढणीसाठी मजुरांची कमतरता आणि त्यात आंबा काढून बाजारात नेला तरी त्याला गिऱ्हाईक नाही. त्यामुळे निर्यात बंद, अशी स्थिती आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात

मच्छिमारी व्यवसाय

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच मासेमारी हा किनारपट्टी भागातील एक प्रमुख व्यवसाय आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मासेमारी होते. लाखोंची उपजीविका मत्स्योत्पादनावर होत असते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसाय पुर्णतः ठप्प झाला आहे.

2018-19 मधील मत्स्योत्पादन

  • रत्नागिरी - 73738 मेट्रिक टन
  • सिंधुदुर्ग - 19054 मेट्रिक टन
  • रायगड - 58847 मेट्रिक टन
  • ठाणे-पालघर - 99461 मेट्रिक टन

गेल्या काही वर्षांचा विचार केला तर मत्स्योत्पादनात घट होत असलेली पाहायला मिळत आहे. त्याची कारणे अनेक आहेत. मत्स्यपिल्लांची अनिर्बंध मासेमारी, अरबी समुद्रातील वादळे आणि समुद्रात घडलेल्या काही अशास्त्रीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनात घट होत असते. निसर्गाच्या लहरीपणामुळेही अनेकवेळा मासेमारी ठप्प असते. त्यात आता कोरोनामुळे काही अपवाद वगळता मासेमारी पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे करोडोंची उलाढाल ठप्प झाली आणि याचा फटका या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर हजारो नागरिकांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी कधी नव्हे एवढी घट मत्स्योत्पादनात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... #coronavirus लॉकडाऊनच्या काळात दारूचा काळाबाजार, अनेक वाईन शॉप, बारही फोडले

आंबा उत्पादक शेतकरी संकटात

कोकणचा राजा म्हणून हापूस आंब्याची ओळख आहे. त्यात हापूसला जीआय मानंकनही मिळाले आहे. या आंब्याची चव अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. दरवर्षी जवळपास 10 ते 12 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. पण यावर्षी आंब्याला आधी निसर्गाने ग्रहण लावले. पाऊस लांबल्याने यावर्षी आंबा हंगामाला जवळपास एक महिना उशिरा सुरुवात झाली आहे. यावर्षी आंबा उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यात आता कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. आंबा वाहतूकीस परवानगी मिळाली आहे. मात्र, बाजारात आंबा नेऊनही आंब्याला गिऱ्हाईक नाही आणि दरही नाही. त्यात आंबा काढणीसाठी मजुरांचीही कमतरता आहे. आंबा हे नाशिवंत फळ, त्यामुळे झालेला खर्चही यावर्षी निघणे शक्य नाही.

आंबा व्यवसायातून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये 2000 हजार कोटींची उलाढाल होत असते. या तीन जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर जवळपास 1200 कोटींचे कर्ज आहे. दरम्यान सर्वाधिक आंबा उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात होते. दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1.25 ते 1.50 लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 78 हजार मेट्रिक टॅन आणि रायगड जिल्ह्यात 20 हजार मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. पण यावर्षी मात्र उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी आहे. त्यात कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणखी संकटात सापडला आहे.

मागील 7 ते 8 महिने आंब्यावर खर्च करून झाला आहे. आता फळ ज्यावेळी तयार होऊ लागले आहे. त्यावेळी मात्र कोरोनाचे ग्रहण लागले आहे. झालेला खर्चही निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कोरोनामुळे आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय दोन्ही संकटात सापडले आहेत.

हेही वाचा... कोरोनाचा पालेभाज्या आणि फळांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल; जाणून घ्या माहिती एका क्लिकवर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.