रत्नागिरी - बुधवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2012 झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 17 तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान 22 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 357 झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 589 आहे.
238 ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 238 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 51, दापोलीत 9, खेड 64, लांजा तालुक्यात 8, चिपळूण 97, मंडणगड तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4, राजापूर 3, संगमेश्वर तालुक्यात 1 कंटेन्मेंट झोन आहे.
27 हजार 700 जण होम क्वॉरंटाइन
मुंबईसह एम.एम.आर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. बुधवारपर्यंत होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या 27 हजार 700 आहे.
16 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 18 हजार 941 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 545 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2012 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 16 हजार 522 अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप 396 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. ते रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खासगी लॅबचे आकडे समाविष्ट नाहीत.