ETV Bharat / state

रत्नागिरीत कोरोना फिडबॅक कक्ष स्थापन, प्रत्येक गावातून घेतला जातो आढावा

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांची फौज गावांमध्ये जाऊन तेथील घटनांवर प्रत्यक्ष लक्ष ठेवत आहेत. या कमिटीचे कामकाज कसे सुरु आहे, ते नियमित भेटी देतात का, गावामध्ये काही नवीन घटना घडली का, याची माहिती घेण्यासाठी फिडबॅक कक्षातून दररोज 200 जणांशी संवाद साधला जातो.

रत्नागिरीत कोरोना फिडबॅक कक्ष स्थापन
रत्नागिरीत कोरोना फिडबॅक कक्ष स्थापन
author img

By

Published : Apr 27, 2020, 3:22 PM IST

रत्नागिरी - कोरोनाविरोधात लढण्यासाठी ग्रामीण भागातही शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवसातच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत फिडबॅक कक्ष स्थापन केला. सोबतच कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी गाव स्तरावर ग्रामकमिटी स्थापन केल्या गेल्या आहेत.

शासनाची यंत्रणाही त्यात सहभागी आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांची फौज गावांमध्ये जाऊन तेथील घटनांवर प्रत्यक्ष लक्ष ठेवत आहेत. या कमिटीचे कामकाज कसे सुरू आहे, ते नियमित भेटी देतात का, गावामध्ये काही नवीन घटना घडली का, याची माहिती घेण्यासाठी फिडबॅक कक्षातून दररोज 200 जणांशी संवाद साधला जातो.

नियमित संपर्क साधल्यामुळे गावामध्ये कोणी नवीन व्यक्ती आली आहे का किंवा विलगीकरणात ठेवलेल्या कोरोना संशयितांच्या घरी कर्मचारी भेटी देत आहेत का, याची माहिती मिळते. फोनवरुन संवाद साधल्यामुळे कर्मचारीही गांभीर्याने काम करताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.