ETV Bharat / state

रत्नागिरीत 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; तर कोरोनाबधितांची संख्या 484 वर

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 484 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 70 टक्क्यांच्या पुढे आहे.

रत्नागिरी कोरोना अपडेट
रत्नागिरी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 22, 2020, 1:51 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 21 झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 484 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 70 टक्क्यांच्या पुढे आहे.

आज आणखी 2 कोरोना बधितांचा मृत्यू झाला. यात रत्नागिरीजवळच्या शिरगावमधील 65 वर्षीय वृद्धाचा तर संगमेश्वर तालुक्यातील काडवली येथील 42 वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. तर गेल्या 2 दिवसांत एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 21 झाली आहे. तर आज चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन आणि कोरोना सेंटर समाज कल्याणमधील दोन जणांनी आज कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 353 झाली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 111 एवढी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.