ETV Bharat / state

Ratnagari Refinery project : रिफायनरी प्रकल्पासाठी आमची जमीन घ्या ; शेतकऱ्यांकडून एकूण 3 हजार एकरची संमतीपत्रे

author img

By

Published : Jun 14, 2022, 8:54 AM IST

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी ( green refinery projec ) लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्या बैठकिच्या आधी या परिसरातल्या काही गावातील काही शेतकऱ्यांनी आपली जमिन प्रकल्पासाठी घ्यावी अशी लेखी संमत्तीपत्र व सातबारा उतारे सादर केले. यावेळी शिवसेना आमदार राजन ( Shiv Sena MLA Rajan Salvi ) साळवी, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, अप्पर जिल्हाधिकारी संजय ( Deputy Collector Sanjay Shinde ) शिंदे, तसेच प्रकल्प समर्थक उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून एकूण 3 हजार एकरची संमतीपत्रे

रत्नागिरी- प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी संदर्भात जिल्ह्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे विरोध पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही शेतकरी स्वतःहुन आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देण्यास पुढे येत आहेत. धोपेेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी ( Ratnagari Refinery project ) आमची जमिन घ्या, असे म्हणत जमीन मालकांनी आज आपली संमत्तीपत्र ( Consent letters from farmers ) दिली आहेत. जमीन मालकांनी तीन हजार एकरहून अधिक जागेची समंतीपत्रे एमआयडीसी आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहेत.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी ( green refinery project ) लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्या बैठकिच्या आधी या परिसरातल्या काही गावातील काही शेतकऱ्यांनी आपली जमिन प्रकल्पासाठी घ्यावी अशी लेखी संमत्तीपत्र व सातबारा उतारे सादर केले. यावेळी शिवसेना आमदार राजन ( Shiv Sena MLA Rajan Salvi ) साळवी, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, अप्पर जिल्हाधिकारी संजय ( Deputy Collector Sanjay Shinde ) शिंदे, तसेच प्रकल्प समर्थक उपस्थित होते. प्रकल्पाच्या समर्थनासाठी जमिन मालकांनी दिलेल्या समंतीपत्राचं स्वागत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केले आहे. एवढी संमतीपत्र इथं आली यातच आपला मोठा विजय आहे, प्रकल्प झाला पाहिजे या मुद्यावर या निमित्ताने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी ही संमती दिली हा स्तुत्य उपक्रम आहे, भविष्यात शासनाकडून आणि महामंडळाकडून सर्व सहकार्य मिळेल अशी ग्वाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्या एनजीओना हद्दपार केलं पाहिजे - रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्या एनजीओना हद्दपार केलं पाहिजे आणि भविष्यात या एनजीओना आम्ही हुसकावून लावणारच, असा इशारा शिवसेना आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. दरम्यान हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेना आमदार राजन साळवी यांनी घेतली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत स्थानिक सरपंच, प्रशासक यांना बैठकीसाठी बोलाविले. रिफायनरीच्या विरोधात येणाऱ्या एनजीओना हद्दपार केलं पाहिजे, असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन

हेही वाचा-Refinery In kokan : 'रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, विरोध करणाऱ्या एनजीओंना आम्ही हुसकावून लावणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.