रत्नागिरी - रत्नागिरीमध्ये तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मधल्या काळात रत्नागिरी काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस भवन कार्यकर्त्यांनी पूर्ण भरल्याने काँग्रेसच्या नेत्या अॅड हुस्नबानू खलीफे यांनी समाधान व्यक्त करत भविष्यात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन केले.
प्रशासनाला निवेदन-
यावेळी प्रकाश नाईक म्हणाले, मोदी सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत आहे. तसेच हुकूमशाही पद्धतीने शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे नेते अॅड सदानंद गांगण, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काँग्रेस भवन येथील कार्यक्रमानंतर निवासी जिल्हाधिकारी यांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रत्नागिरी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![काँग्रेस रॅली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-congressnivedan-ph01-mh10046_12022021134743_1202f_1613117863_361.jpg)
हेही वाचा- नाना पटोले यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार