खेड (रत्नागिरी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे गद्दार नाही तर खुद्दार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे. तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंदा होणारा नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात : मागील काही दिवसांपूर्वी खेडमधील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणत शिंदे सरकारचा मिंधे सरकार म्हणून केला होता. यावरून आज मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार प्रहार केला. अशी टीका
खुर्चीसाठी गद्दारी केली : त्यांच्याकडे खोके आणि गद्दार एवढेच शब्द आहेत. पण सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडले तसेच तुम्ही खुर्चीसाठी गद्दारी केली, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली. आजच्या सभेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती आहे. काही लोकांना वाटत असेल की या सभेला एवढी गर्दी कशी झाली, खरंतर बाळासाहेबांच्या प्रेमापोटी एवढा मोठा जनसागर लोटला आहे. आजही कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि हिंदुत्वाच्या पाठीशी आहे.
सर्कशींचे शो सुरू होणार : मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, काही लोक आजची सभा पाहत असतील. पण मी पूर्वी झालेली सभा आणि आजची सभा यामध्ये तुलना करायला आलेलो नाही. काही दिवसांपूर्वी आपटी बार येऊन गेला. या आपटीबाराच्या आरोप किंवा टीकेला उत्तर आम्ही देत नाही. गेल्या सहा महिन्यापासून मुंबईत आदळआपट सुरू आहे. तसेच महाराष्ट्रात देखील सर्कसीप्रमाणे त्यांचे शो होणार आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
धनुष्यबाण दावणीला बांधले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी सत्तेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे दावणीला बांधले. गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवण्याचे काम केले. अखेरीस, निवडणूक आयोगाने देखील आम्हाला शिवसेनाही दिली आणि धनुष्यबाण दिला. त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली म्हणून हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला. बाळासाहेब म्हणाले होते की, नाव गेले ते परत मिळवता येत नाही. 2019 सालीच झाली गद्दारी करत तुम्ही हिंदुत्वाचे राजकारण केले आणि बाळासाहेबांच्या विचारानांच चुकीचे ठरवले, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी लावला.
हेही वाचा : Supriya Sule Appeal State Govt: 'सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ईडी सरकार असंवेदनशील'