रायगड - जिल्ह्यातील नागरिकांनी खुल्या मैदानातून, घरांच्या गॅलरीमधून हे सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला. जिल्ह्यात पाहिल्यांदाच असे सूर्यग्रहण पाहण्यास मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
हेही वाचा... चर्चगेट स्टेशनला 'चर्चगेट' हे नाव कसे पडले माहिती आहे का..?
आज गुरूवारी जगभर वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्यास मिळाले आहे. हा अनुभव रायगडकरांनीही अनुभवला आहे. जिल्ह्यात काल 25 डिसेंबर रोजी पाऊस पडल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सूर्यग्रहण दिसेल की नाही, अशी शंका होती. मात्र ढगाळ वातावरण असले तरी जिल्ह्यातील अनेक भागात हे सुर्यग्रहण पहायला मिळाले. लहान मोठ्यांसहीत सर्वांनीच याचा अनुभव घेतला.
हेही वाचा... जगात सर्वात स्वस्त डाटाचे दर असलेल्या दूरसंचार क्षेत्रावर आहे 'हे' संकट