ETV Bharat / state

कोकणातल्या आंबा-काजू बागायतदारांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही - नारायण राणे - रत्नागिरी आंबा उत्पादक शेतकरी

येथील आंबा-काजू बागायतदारांनी राणेंना निवेदनं देऊन आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका शेतकऱ्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, अशी खंत व्यक्त केली होती. यावर नारायण राणे यांनी तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

बागायतदारांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही - नारायण राणे

author img

By

Published : Aug 27, 2021, 1:16 PM IST

Updated : Aug 27, 2021, 1:32 PM IST

रत्नागिरी - कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, तसेच तुम्हाला दिलेले शब्द मी पूर्ण करेन असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले आहे. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त रत्नागिरीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोळप येथे आंबा प्रक्रिया उद्योजक विजय देसाई यांच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी आणि आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग , काजू उत्पादक प्रतिनिधीशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या तसेच आपली निवेदनं राणे यांना दिली. त्यानंतर जन आशीर्वाद यात्रेत बोलताना राणे यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

आंबा-काजू बागायतदारांवर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही - नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्या जन आशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. त्यानंतर आजपासून(शुक्रवार) झाली. यावेळी येथील आंबा-काजू बागायतदारांनी राणेंना निवेदनं देऊन आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका शेतकऱ्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, अशी खंत व्यक्त केली होती. यावर नारायण राणे यांनी तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असे मत व्यक्त केले. तसेच जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, असे आश्वासनही येथील शेतकऱ्यांना राणे यांनी यावेळी दिले आहे.

राणे म्हणाले, मी आपल्याला एवेढच सांगतो, की तुमचे निवेदन मला मिळाले आहे, त्या निवेदनाचा पूरेपूर अभ्यास करून तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळेल यासाठी प्रयत्न करेन. मी देशातील एक कॅबिनेट मंत्री असलो तरी मी कोकणातूनच पुढे गेलो आहे, त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना माझ्या मंत्री पदाचा फायदा मिळावा यासाठी मी पुरेपुर प्रयत्न करेन असेही राणे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देणार नसल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Aug 27, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.