रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'वादळं येताहेत, महापूर येताहेत. हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे', असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
'मुख्यमंत्री आल्यापासून वादळं काय पाऊस काय, सगळं चालूच आहे. कोरोना काय, कोरोना त्यांची देण आहे. आपल्याला मुख्यमंत्री आले, कोरोना घेऊन आले. त्यांचे पाय बघायला पाहिजेत पांढरे आहेत का ते', असा हल्लाबोल नारायण राणेंनी केली.
चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकणातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली.
'तळीयेतील पूरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं'
-
रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले. pic.twitter.com/EJB7805L08
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले. pic.twitter.com/EJB7805L08
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले. pic.twitter.com/EJB7805L08
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने थैमान घातल्याने अनेकांचे जीव गेले. खासकरून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 52 गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतर्गंत सर्वांना घरे बांधून देण्यात येणार अशी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडूनही चिपळूण पूरग्रस्त भागाची पाहणी, पीडितांशी साधला संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आज (25 जुलै) चिपळूणचा दौरा केला. त्या भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. तीन दिवसापूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मुख्य बाजारपेठ आणि नागरी वस्तीत सहा ते सात फूट पाणी शिरले होते. आता परिस्थिती निवळली असली तरी, पूरानंतर सावरण्यासाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण दौऱ्यावर आले होते.
हेही वाचा - VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू